Manu Bhaker News : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची स्पर्धा भारतीय खेळाडूंना एक नवीन ओळख देऊन गेली. मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत भारताला एक पदक कमी जिंकता आले असले तरी मनू भाकरसारख्या खेळाडूने एक नवी छाप सोडली. नीरज चोप्राला रौप्य पदक जिंकता आले. भारताने एकूण सहा पदके जिंकण्यात यश मिळवले. एकाच ऑलिम्पिक दोन पदके जिंकून मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी केली. कांस्य पदक जिंकणाऱ्या मनूचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. सचिनच्या भेटीनंतर मनूने भारी कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मनूने सचिनसोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत म्हटले की, द वन अँड ओन्ली सचिन तेंडुलकर सर... क्रिकेटच्या आयकॉनसोबत भेट झाल्याने धन्य वाटत आहे. त्यांच्या प्रवासाने मला आणि आपल्यापैकी अनेकांना आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा मिळते. सर, अविस्मरणीय आठवणींबद्दल खूप धन्यवाद.
मनू भाकरची ऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरी
२८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. ३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.