शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

Paris Olympics 2024 : Manu Bhaker प्रसिद्धीच्या झोतात! 'त्या' जाहिराती करणाऱ्यांना बसणार दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:30 PM

paris olympics 2024 : मनू भाकरने दोन कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.

manu bhaker paris olympics : ऑलिम्पिक म्हणजे खेळाडूंसाठी स्वत:ची एक ओळख बनवण्याचे मोठे व्यासपीठ असते. सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा थरार रंगला आहे. भारताची महिला नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना दोन कांस्य पदकांवर निशाणा साधला. रविवारी मनू भाकरने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले होते. मंगळवारी यात भर पडली असून, तिने सरबजोत सिंगसोबत आणखी एका पदकाला गवसणी घातली. मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदक पटकावले. पदविजेती मनू प्रसिद्धीच्या झोतात असून, आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय बनली आहे. 

मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला. याआधी रविवारी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. खरे तर मनू भाकरचे व्यवस्थापन आयओएस स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट ही कंपनी करते. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच अनेकांनी मनूचा फोटो वापरून अभिनंदनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. यावर मनूच्या व्यवस्थापन कंपनीने आक्षेप घेतला. मनूला न कळवता तिचे फोटो आणि व्हिडीओ वापरून अभिनंदनाच्या जाहिराती बनवणाऱ्या ब्रँडवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तिच्या टीमने स्पष्ट केले. अशी माहिती 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिली.

मनूच्या व्यवस्थापन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कालपासून जवळपास दोन डझन ब्रँड्स जे मनूशी संबंधित नाहीत, त्यांनी तिचे फोटो आणि त्यांच्या ब्रँडसह सोशल मीडियावर अभिनंदनपर जाहिराती जारी केल्या आहेत. हे चुकीचे असून याला कोणतीही परवानगी नाही. कायदेशीररित्या आम्ही या ब्रँडना कायदेशीर नोटीस बजावत आहोत. संबंधित कंपन्या मोफत मार्केटिंग करू पाहत आहेत. ते आम्ही चालू देणार नाही. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४IndiaभारतAdvertisingजाहिरात