शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

क्रीडासंस्कृतीला चालना देण्यासाठी मॅरेथॉन महत्त्वाची: पुनित बालन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 7:58 AM

कुठल्याही देशाच्या उन्नतीसाठी क्रीडा संस्कृती बहरत असणे हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशाचा क्रीडाक्षेत्रातला सहभाग आणि आपल्या खेळाडूंचे यश हे देशातील नागरिकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतं.

कुठल्याही देशाच्या उन्नतीसाठी क्रीडा संस्कृती बहरत असणे हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशाचा क्रीडाक्षेत्रातला सहभाग आणि आपल्या खेळाडूंचे यश हे देशातील नागरिकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतं. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक ओळख मिळवून देतं आणि एकीची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवतं. आपल्या मुष्टियोध्यांच्या जोरावर सुवर्णकमाई करणारा क्युबा किंवा धावपटूंच्या पराक्रमामुळे ओळखला जाणारा जमैका यांसारखे लहानसे देश केवळ त्यांच्या क्रीडा संस्कृतीच्या जोरावर आगेकूच करताना आपल्याला दिसून येतात.

गेल्या काही वर्षांत भारतातील क्रीडाक्षेत्र खूपच झपाट्याने प्रगती करताना दिसून येत आहे आणि विशेष करून अॅथलेटिक्स -  ज्याला क्रीडाक्षेत्राची जननी मानले जाते अशा स्पर्धांतही भारतीय खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करताना दिसून येत आहेत. युवा पिढी नीरज चोप्रासारख्या युवा खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवून क्रीडाक्षेत्रात नाव कमावण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे. आपल्याला जर या धडपडीला अजून पाठबळ द्यायचे असेल, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्वप्रथम तंदुरुस्तीचे महत्त्व रुजवले पाहिजे. पाश्चात्य देशातील नागरिकांनी हे जाणले आहे आणि त्यांच्याकडे आबालवृद्ध कुठल्या न कुठल्या व्यायामाद्वारे आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याकडील मॅरथॉन स्पर्धा पाहताना हे प्रकर्षाने जाणवते. मॅरेथॉन किंवा धावणे हा असा क्रीडा प्रकार आहे जो कुठलीही व्यक्ती सहजगत्या आत्मसात करू शकते आणि कित्येक वर्षे त्याद्वारे स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकते.

ज्या वेळी आपला समाज म्हणून एकसंधपणे तंदुरुस्तीच्या दिशेने प्रवास सुरु होतो, त्या वेळी आपसूकच क्रीडासंस्कृतीला कमालीचे पाठबळ मिळते. दैनिक लोकमत गेली काही वर्षे या दृष्टीने प्रयत्नशील राहिले आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांत सुरुवातीपासूनच आम्हालाही सहभागी होता आले आणि समाजाच्या दृष्टीने काही योगदान देता आले त्याबद्दल आम्हाला कमालीचे समाधान मिळाले आहे.

मॅरेथॉन म्हणजे आनंदाचा सोहळा- मॅरेथॉन म्हणजे धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य जपू पाहणाऱ्यांसाठी पर्वणी- मॅरेथॉनद्वारे दिला जात आहे सामाजिक संदेश- मॅरेथॉन म्हणजे समाज म्हणून एकसंधपणे तंदुरुस्तीच्या दिशेने प्रवास- मोठ मोठे कलाकार, व्यावसायिक, खेळाडू आणि नामवंत व्यक्ती आदींचा सहभाग हे आकर्षण- नियमितपणे धावण्याकडे नागरिकांचा वाढता कल

पुनित बालनअध्यक्ष, पुनित बालन ग्रुप