मेलबोर्न : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच, अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स, रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हा यांना १९ जानेवारीपासून होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत सोपा ड्रॉ मिळाला आहे़ मात्र, पुरुष गटात गत चॅम्पियन स्टेनिसलास वावरिंकाला कठीण ड्रॉ मिळाल्याने त्याला स्पर्धेत विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे़गत चॅम्पियन वावरिन्काला मात्र आपला किताब वाचविण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे़ त्याला पहिल्या फेरीत तुर्कीच्या मार्सेल ल्हानशी झुंजावे लागणार आहे़ त्याआधी त्याला राउंडअप मुकाबल्यात १६व्या मानांकनप्राप्त इटलीच्या फेबिगो फोगनिनीचा सामना करावा लागेल़ यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये मजल मारणाऱ्या जपानच्या केई निशिकोरीशी होऊ शकतो़ स्पेनच्या राफेल नदाललासुद्धा कठीण ड्रॉ मिळाला आहे़ त्याला पहिल्या फेरीत अव्वल १० खेळाडूंत समावेश असलेल्या रशियाच्या मिखाईल युझनीशी खेळावे लागेल़ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत त्याला झेक प्रजासत्ताकच्या लुकास रसोलशी झुंजावे लागू शकते़जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रॉजर फेडररचा सामना स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तैवानच्या लू येन सुनशी होईल़ तर चौथ्या फेरीत तो १५ व्या क्रमांकावरील स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोविरुद्ध खेळू शकतो़ जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेलाही स्पर्धेत कठीण आव्हान असेल़ त्याला पहिल्या फेरीत तो क्वालिफायरविरुद्ध खेळेल़ मात्र, चौथ्या फेरीत तो स्कॉटलंडचा उदयोन्मुख खेळाडू ग्रिगोर दिमित्रोव्हशी झुंजण्याची शक्यता आहे़ महिला गटात पहिल्या फेरीत सेरेना विल्यम्सचा सामना वॅन वेईटवँकशी होईल़ यानंतर उपांत्यपूर्व फेरीपर्यंत ती कमी अनुभवी खेळाडूंविरुद्ध खेळेल़ सेरेना सहाव्यांदा किताब मिळविण्यासाठी स्पर्धेत खेळेल़ दुसरीकडे मारिया शारापोव्हाला पहिल्या फेरीत क्वालिफायर खेळाडूंचे आव्हान असेल़ यानंतर तिला उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या युजनी बुचार्डशी खेळावे लागू शकते़ (वृत्तसंस्था)
मारिया, सेरेना, जोकोविचला सोपा ड्रॉ
By admin | Published: January 17, 2015 2:51 AM