शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

एका पायाने घेतली मरियप्पनने ‘सुवर्णझेप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2016 4:06 AM

पायाने अधू असूनही दोन पायांवर भक्कम उभ्या राहणाऱ्या अनेकांना लाजवेल, अशी कामगिरी भारताच्या मरियप्पन तंगवेलू याने शनिवारी केली.

रिओ : पायाने अधू असूनही दोन पायांवर भक्कम उभ्या राहणाऱ्या अनेकांना लाजवेल, अशी कामगिरी भारताच्या मरियप्पन तंगवेलू याने शनिवारी केली. रिओ पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी त्याने उंच उडीत ‘झेप’ घेत सुवर्णपदक पटकावले. याच स्पर्धेत पोलिओग्रस्त वरुणसिंग भाटी याने कांस्य पदक मिळवले. मरियप्पन व वरुणच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व भारतीयांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छांचा आणि बक्षिसांचा वर्षाव केला. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मरियप्पनला दोन कोटींचे बक्षीस जाहीर केले. क्रीडा मंत्रालयानेही ७५ लाख रुपयांचे इनाम घोषित केले. पाच वर्षांचा असताना शाळेत जाताना बसने धडक दिल्याने त्याने उजवा पाय गमावला. पाय गेला, जिद्द नव्हे. ‘सुवर्ण’उडी मारण्यासाठी तो झटत राहिला व शनिवारी स्वप्नाची पूर्तता झाली. २१ वर्षांच्या मरियप्पनने १.८९ मीटर ऐतिहासिक उंच उडी घेतली. या प्रकारात सुवर्ण जिंकून देणारा तो पहिला खेळाडू. ट्युनेशिया ग्रांप्री स्पर्धेत १.७८ मीटर उंच उडी घेत मरियप्पनने सुवर्ण जिंकत रिओसाठी पात्रता मिळवली होती. पॅरालिम्पिकमध्ये ‘ए’ लेव्हल पात्रतेसाठी १.६०मीटर उंच उडी आवश्यक असते. (वृत्तसंस्था)मरियप्पनचा जन्म तामिळनाडूतील सेलम शहराजवळच्या एका लहानशा गावात झाला. आई भाजी विकते. काही वर्षांपूर्वी त्याने वैद्यकीय उपचारासाठी तीन लाख कर्ज घेतले होते, जे अजूनही थकीत आहे.लहानपणापासून व्हॉलीबॉलची आवड. तो व्हॉलीबॉलमध्येही रमला. क्रीडा शिक्षकाने त्याच्यातील कौशल्य हेरले.१५व्या वर्षी जीवनातील पहिल्या स्पर्धेत भाग घेतला आणि रौप्यवर नाव कोरले. हा अनेकांना धक्का होता. राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान तो चर्चेत आला. कठीण सरावानंतर तो २०१५मध्ये नंबर वन बनला.