नवी दिल्ली : अव्वल पॅरा ॲथ्लिट मरियाप्पन थंगावेलूची शुक्रवारी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय पथकाचा ध्वजवाहक म्हणून निवड झाली. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत होईल. राष्ट्रीय संस्थेच्या कार्यकारी समितीने ध्वजवाहक म्हणून २०१६ रिओ ऑलिम्पिकमधील टी-४२ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू थंगावेलूची निवड केली. पॅरा ॲथ्लेटिक्सचे चेअरमन आर. सत्यनारायण यांनी सांगितले,
‘मरियप्पन थंगावेलू टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा ध्वजवाहक राहील.’ थंगावेलूला गेल्या वर्षी देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्नने गौरविण्यात आले होते. निवड समितीने २४ पॅरा ॲथ्लिट्सची टोकियो पॅरालिम्पिकसाठी निवड केली आहे.