नवी दिल्ली : भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंह हा त्यागराज स्पोर्टस् कॉम्पलेक्समध्ये १६ जुलैला होणाऱ्या डब्लुबीओ आशिया पॅसिफीक सुपर मिडलवेट स्पर्धेत खेळणार आहे. या सामन्यासाठी विजेंदरचा उत्साह वाढावा, म्हणून आॅलिम्पीक कांस्यपदक विजेती मेरी कोम उपस्थित राहणार आहे. व्यावसायीक स्पर्धेत सलग सहा सामन्यात अपराजीत राहणारा भारताचा विजेंदर सिंह हा १६ रोजी आॅस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू केरी होप याच्याविरोधात रिंगमध्ये उतरणार आहे. विजेंदर सोबतच मेरी कोम बॉक्ंिसग संस्थेच्या दोन बॉक्स येथे तीन राऊंडच्या लढतीत खेळतील. मेरी कोम म्हणाली की, ‘‘ मी विजेंदरच्या या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे. हा एक मोठा सामना होईल. आणि यामुळे देशात प्रो बॉक्सिंगला निश्चीतच प्रोत्साहन मिळेल. आपल्या आवडत्या खेळाडूला समोर खेळताना पाहून युवक बॉक्ंिसगकडे वळतील. आणि देशांत हा खेळ वाढेल.’’मेरी पुढे म्हणाली की, विजेंदर एक उत्तम खेळाडू आहे. तो आतापर्यंत व्यावसायीक खेळात अपराजीत आहे. होप विरोधात होणाऱ्या सामन्यासाठी मी त्याला शुभेच्छा देते. ’’सामन्यासाठी मेरीकोमचे स्वागत करताना विजेंदर म्हणाला की, ‘‘ मी माझ्या बहिणी प्रमाणे असणाऱ्या मेरीकोम हिचे स्वागत करतो. मला आशा आहे की, चाहते या लढतीचा पूर्ण आनंद घेतील. प्रेक्षकांनी या सामन्यासाठी दाखवलेला उत्साह हा मनोबल वाढवणारा आहे.’’
विजेंदरचा उत्साह वाढवणार मेरी कोम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2016 8:12 PM