टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे मेरी कोमचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सीयाकडून भारताच्या स्टार बॉक्सरला पराभव पत्करावा लागला. क्षणभर मेरीलाही आपण हरलोय हे माहित नव्हते. चुरशीच्या या सामन्यात मेरीनं कडवी झुंज दिली आणि आपण जिंकू असा विश्वास तिला होता. पण, रेफरीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा हात उंचावला अन् मेरीचं स्वप्न अपूर्ण राहिले. मेरीचा हा पराभव टीव्हीवर पाहणाऱ्या चिमुरडीला रडू आवरेनासे झाले होते.
राष्ट्रीय संघापेक्षा परदेशी खेळाडू आयपीएलला का देतात महत्त्व?; हे आहे प्रमुख कारण
मेरीनं स्वतः त्या चिमुरडीचा व्हिडीओ पोस्ट करून लिहिलं होतं की,''चिमुकले.. जेव्हा तुला भेटण्याची संधी मिळेल, तेव्हा तुला मिठी मारीन. जर तुला कुठल्या खेळात रस असेल तर त्यासाठीही मी तुला मदत करेन.''
नेटिझन्सकडून कौतुक