शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मेरीकोमची विजयी सुरुवात; नेपाळच्या माला रायचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 5:04 AM

इंडिया ओपन बॉक्सिंग : पवनचा युवा आॅलिम्पिक विजेत्याला धक्का

गुवाहाटी : नव्या वजनी गटातून खेळताना भारताची स्टार बॉक्सर एम. सी. मेरीकोम हिने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत विजयी सुरुवात करताना नेपाळच्या माला रायचा पराभव केला. यासह स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना मेरीकोमने आपले पदकही पक्के केले. दुसरीकडे, हरियाणाचा युवा बॉक्सर पवन नारवालने ६९ किलो वजन गटता युवा आॅलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता ब्रायन अरेगुई आगस्टीनचा पराभव करीत पुरुष विभागात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सहावेळची विश्वविजेती असलेल्या मेरीकोमने मालाचा सहज पराभव करताना ५१ किलो वजनी गटातून ५-० अशी धमाकेदार विजयी सलामी दिली. आगामी आॅलिम्पिकमध्ये ४८ किलो वजनी गटाचा समावेश नसल्याने मेरीकोमने ५१ किलोवजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मेरीकोमच्या दमदार खेळापुढे निभाव न लागल्यानंतरही मालाने सामना संपल्यानंतर हसऱ्या चेहºयाने मेरीकोमला शुभेच्छा दिल्या.अन्य एका लढतीत माजी विश्वविजेत्या सरिता देवीने ६० किलो वजनी गटात प्रीती बेनीवालचा ५-० असा धुव्वा उडवत सहजपणे उपांत्य फेरी गाठली. तिनेही या विजयासह आपले पदक निश्चित केले.

अर्जेंटिनाच्या ब्रायनने पहिल्या फेरीत वर्चस्व गाजवले, पण २१ वर्षीय पवनने दमदार पुनरागमन करीत खंडित निर्णयामध्ये ४-१ ने बाजी मारली. पवनची यानंतरची लढत मॉरिशसच्या क्लेयर मार्व्हनसोबत होईल.

६९ किलो गटात दिनेश डागरने फिलिपाइन्सच्या मर्जोन अंगकोन पियानारचा ३-२ ने पराभव करीत आगेकूच केली. यूथ आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता अंकित खटानाने (६० किलो) फिलिपाइन्सच्या रियान इंपोक मोरेनोचा पराभव केला.