शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सामना चॅम्पियन्सचा

By admin | Published: May 19, 2017 3:07 AM

केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील हायव्होल्टेज क्वालिफायर २ चा सामना आज बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना म्हणजे चॅम्पियन्स

- आॅनलाइन लोकमत

केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील हायव्होल्टेज क्वालिफायर २ चा सामना आज बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना म्हणजे चॅम्पियन्स विरुद्ध चॅम्पियन्स असाच राहील.दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्येही विशेष सामना होईल. आक्रमक गंभीर आणि शांत स्वभावाचा रोहित शर्मा. गंभीरच्या आक्रमकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते. त्याने वेळोवेळी आक्रमकता आणि खेळपट्टीवर संयमाचे प्रदर्शनदाखवले आहे. तर रोहित शर्मा हा सर्वात गुणवान क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात असला. तर स्लिपींग ब्युटी ही त्याची खास ओळखही आहे. रोहितने आपल्या संघाला एकट्याच्या बळावर अनेकवेळा सामने जिंकून दिले आहे. तर दोनदामुंबईला आयपीएलचे विजेतेपदही जिंकून दिले.गौतम गंभीरने केकेआरला आपल्या बळावर अनेकदा सामने जिंकून दिले आहे. त्याची बॅट चालायला लागली की प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा घाम निघतो. त्याने या सत्रात संघाच्या रणनितीत अनेक बदल केले आहेत. त्याचा देखील फायदा केकेआरला झाला.बिग बॅशमधील संघ मेलबर्न रेनेगड्स्च्या पावलावर पाऊल टाकत गौतम गंभीर याने सुनिल नरेन आणि ख्रिस लीन यांना फलंदाजीला पाठवले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी गौतम गंभीरने आपले सलामीचे स्थानही सोडले.केकेआरसमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते मुंबईच्या अफलातून गोलंदाजीचे.डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह, मॅक्लेघन, कर्ण शर्मा, हरभजन, मलिंगा यांचे गोलंदाजीचे मिश्रण अफलातून आहे.तर मुंबईला देखील कुल्टर नाईल, ग्रॅण्डहोम, उमेश यादव, कुलदीप यांच्या भेदक माऱ्याला सामोरे जावे लागेल.केकेआरचे संघ व्यवस्थापन जखमी मनिष पांडे ऐवजी कुणाला संधी देते हे पाहणे रंजक ठरेल. गेल्या सामन्यात इशांक जग्गीला संधी मिळाली होती. मुंबईच्या संघात नितीश राणा की अंबाती रायडू यापैकी एकाला संधी मिळेल. मुंबईच्या फलंदाजांना मात्र या सामन्यात मोठी धावसंख्या उभारावी लागेल.या सामन्यातील विजेता संघ पुण्यासोबत अंतिम फेरीत लढणार आहे. त्यातील १५ सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. या सामन्यातील विजेता संघ पुण्यासोबत अंतिम फेरीत लढणार आहे.