शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

इंग्लंडची बरोबरी

By admin | Published: August 01, 2014 1:12 AM

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला आज पाचव्या व शेवटच्या दिवशी संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध २६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

साऊथम्पटन : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला आज पाचव्या व शेवटच्या दिवशी संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध २६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यजमान संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या निकालासह इंग्लंडने १० कसोटी सामन्यांनंतर पराभवाची मालिका खंडित करण्यात यश मिळविले. उभय संघांदरम्यान ओल्ड ट्रॅफर्डवर ७ आॅगस्टपासून चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे.भारताच्या ६ विकेट शिल्लक होत्या आणि पराभव टाळण्यासाठी आज अखेरचा दिवस खेळून काढण्याचे लक्ष्य होते. एजेस बाऊलच्या खेळपट्टीवर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. एकतर्फी झालेल्या या लढतीत इंग्लंडने भारताचा दुसरा डाव ६६.४ षटकांत १७८ धावांत गुंडाळला. धावांचा विचार करता इंग्लंडमध्ये हा भारताचा मोठ्या फरकाने पत्कराव्या लागलेल्या पराभवापैकी एक ठरला. २०११च्या दौऱ्यात नॉटिंघम कसोटीत भारताला ३१९ धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. कामचलाऊ फिरकीपटू मोईन अलीने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना २०.४ षटकांत ६७ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अँडरसनने रोहित शर्माला (६) माघारी परतवत आज इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. महेंद्रसिंग धोनी (६) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेचा (नाबाद ५२) अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड देता आले नाही. रवींद्र जडेजाचा (१५) अडथळा मोईन अलीने दूर केला. भुवनेश्वर कुमार (०) व मोहम्मद शमी (०) यांना आज खातेही उघडता आले नाही. भारताने अखेरच्या ६ विकेट केवळ २४.४ षटकांत गमावल्या. अलीने आज २२ चेंडूंमध्ये १७ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. अलीने चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांना माघारी परतवले होते. रहाणेने १२१ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकारांच्या साह्याने नाबाद ५२ धावांची खेळी केली. ७७ धावांच्या मोबदल्यात या लढतीत ७ बळी घेणारा जेम्स अँडरसन ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. (वृत्तसंस्था)