सामना भारत विन जोड
By admin | Published: September 01, 2015 9:38 PM
मालिकेत प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कोहलीने भारतातर्फे नवा विक्रम नोंदवला. २६ वर्षे ३०० दिवस वय असलेला कोहली विदेशात कसोटी मालिका जिंकणारा सर्वांत कमी वयाचा भारतीय कर्णधार आहे. कोहलीने कपिल देवचा विक्रम मोडला. कपिलने १९८६ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका विजय साकारला होता त्यावेळी त्याचे वय २७ वर्षे १६८ दिवसांचे होते.
मालिकेत प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कोहलीने भारतातर्फे नवा विक्रम नोंदवला. २६ वर्षे ३०० दिवस वय असलेला कोहली विदेशात कसोटी मालिका जिंकणारा सर्वांत कमी वयाचा भारतीय कर्णधार आहे. कोहलीने कपिल देवचा विक्रम मोडला. कपिलने १९८६ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका विजय साकारला होता त्यावेळी त्याचे वय २७ वर्षे १६८ दिवसांचे होते. चेतेश्वर पुजारा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या कसोटी सामन्यात पुनरागमन करताना पुजाराने पहिल्या डावात सलामीला खेळताना नाबाद १४५ धावांची खेळी केली. श्रीलंकेने कालच्या ३ बाद ६७ धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. ईशांत शर्माने दिवसाच्या पहिल्याच षटकात मॅथ्यूजला बाद केले होते, पण तो नोबॉल होता. भारताला ही भागीदारी संपुष्टात आणण्यासाठी फार वेळ प्रतीक्षा करावी लागली नाही. मॅथ्यूजचा सहकारी कौशल सिल्वाला संयमी खेळी करण्यात अपयश आले. उमेश यादवच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल शॉर्ट मिडविकेटला चेतेश्वर पुजाराने टिपला. त्याने मॅथ्यूजसोबत चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. लाहिरू थिरिमानेला (१२) लौकिकाला साजेशी फलंदाजी करण्यात अपयश आले. अश्विनच्या गोलंदाजीवर थिरिमानेचा उडालेला झेल सिली पॉईंटवर तैनात के.एल. राहुलने टिपला. त्यानंतर खेळपट्टीवर आलेला यष्टिरक्षक फलंदाज कुशाल परेराने संयमी फलंदाजी केली. श्रीलंकेने पहिल्या सत्रात केवळ ६७ धावा फटकावल्या आणि दोन विकेट गमाविल्या. दुसऱ्या सत्रात मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करीत ११५ धावा वसूल केल्या आणि केवळ एक विकेट गमावली. मॅथ्यूज व परेरा यांनी एकरी व दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. संधी मिळाली तर चेंडूला सीमारेषा दाखविण्यास त्यांनी चुक केली नाही. परेरा पदार्पणाच्या कसोटीत दोनही डावत अर्धशतके झळकाविणारा दुसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला. यापूर्वी दिनेश चांदीमलने हा पराक्रम केला आहे.