शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

महापौर चषक अ.भा. कबड्डी

By admin | Published: February 13, 2015 12:38 AM

महापौर चषक अ.भा. कबड्डी स्पर्धेला सुरुवात

महापौर चषक अ.भा. कबड्डी स्पर्धेला सुरुवात
आरसीएफ, सीआरपीएफची विजयी सलामी
नागपूर : मुंबई येथील आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स) आणि दिल्ली येथील सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) संघांनी नागपूर महानगर पालिकेच्यावतीने गुरुवारी चिटणीस पार्कवर सुरू झालेल्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी महापौर चषक अ.भा. कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. महिला गटात पुण्याच्या जागृती प्रतिष्ठानने आणि कोलकाता येथील द. पूर्व रेल्वे संघांनी देखील आपापल्या सलामी लढती जिंकल्या.
१५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. मिलिंद माने, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपा स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर, संयोजक सुधीर राऊत, शिक्षण सल्लागार समिती अध्यक्ष चेतना टांक, नागपूर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गिरीश व्यास, माजी अध्यक्ष मदन रतन उपस्थित होते.
त्याआधी महाल येथील हनुमान मंदिरातून खेळाडूंनी आणलेल्या क्रीडाज्योतीद्वारे महापौरांनी स्पर्धेची ज्योत प्रज्वलित केली. मनपाच्या प्रियदर्शिनी उच्च प्राथमिक शाळा आणि सरस्वती तिवारी हिंदी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. संदीप भोयर आणि पौर्णिमा उपरीकर यांनी स्पर्धेत सहभागी पुरुषांच्या ३० आणि महिलांच्या २४ संघातील खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. हंबीरराव मोहिते यांनी केले. क्रीडा व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष हरीश दिकोंडवार यांनी आभार मानले.
पुरुष गटात मुंबईच्या आरसीएफने नवी दिल्लीच्या सुपर सेव्हन संघाला २६-२४ गुणांनी नमविले. सुपर सेव्हन संघाने मध्यंतरापर्यंत १७-१३ अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. अन्य सामन्यात अनिलकुमार व रामचंद्रच्या उत्कृष्ट चढाईच्या जोरावर दिल्लीच्या सीआरपीएफने मुंबईच्या साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) संघाला ४८-१० अशा गुणफरकाने नमविले.
महिला गटात पुण्याच्या जागृती प्रतिष्ठान आणि नोएडा येथील नोएडा महाविद्यालय यांच्यातील लढत चुरशीची झाली. निशूची उत्कृष्ट चढाई आणि रुपालीच्या दमदार पकडच्या बळावर मध्यंतरापर्यंत नोएडा कॉलेजने १९ गुण नोंदविले. जागृती प्रतिष्ठानला १२ गुण नोंदविणेच शक्य झाल्यामुळे नोएडा कॉलेजने ७ गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर जागृती प्रतिष्ठानच्या खेळाडूंनी वर्चस्वपूर्ण खेळ करीत संघाला ३०-२९ असा निसटता विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात के. बिश्वासच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर कोलकाता येथील दक्षिण पूर्व रेल्वेने मुंबईच्या डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबला २४-१६ अशा गुणफरकाने नमविले. या लढतीत मध्यंतरापर्यंत गुणसंख्या १७-१० अशी होती. (क्रीडा प्रतिनिधी)