शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मीराबाईला सातत्याने सतावत आहे दुखापतग्रस्त होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 4:44 AM

भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे;

नवी दिल्ली : भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे; पण पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकपूर्वी पुन्हा दुखापतग्रस्त होण्याची भीती सतावत असल्याचे तिने सांगितले.कंबरेच्या दुखापतीमुळे २०१८ मध्ये मीराबाईला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर मीराबाईने कंबरेचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती.ही दुखापत भारतीय डॉक्टरांसाठी आव्हान ठरली होती. कारणत्यांना याचे कारण शोधता आले नव्हते. या दुखापतीमुळे २४ वर्षीय भारतीय खेळाडूला आशियन गेम्स व विश्व चॅम्पियनशिपला मुकावे लागले.मीराबाई म्हणाली, ‘दुखापतीनंतर बरेच काही बदलले. पुन्हा दुखापतग्रस्त झाले तर काय होईल, अशी भीती सतत असते. प्रत्येक वेळी वजन उचलताना आणि प्रत्येक सराव सत्रापूर्वी मला दोनदा विचार करावा लागतो.’ जवळजवळ नऊ महिन्यांनी वेदना कमी झाल्यानंतर मीराबाईने खेळामध्ये यशस्वी पुनरागमन केले. पुनरागमनात तिने थायलंडमध्ये आपल्या पहिल्या स्पर्धेत ईजीएटी कपमध्ये सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, मीराबाई व प्रशिक्षक विजय शर्मा यांना सरावामध्ये बदल करावा लागला.मीराबाई म्हणाली, ‘माझी पद्धत बदलली. कारण दुखापत का झाली, याचे कारण आम्हाला कळले नाही. हे कुठल्या व्यायामामुळे झाले की माझ्या तंत्रात काही चूक होती, हे आम्हाला कळले नाही.’शर्मा म्हणाले, ‘आम्ही सावधगिरी बाळगत आगेकूच करीत आहोत.’ पुनरागमनानंतर मीराबाईची कामगिरी उल्लेखनीय ठरली. एप्रिलमध्ये आशियन चॅम्पियनशिपमध्ये तिचे थोड्या फरकाने पदक हुकले. मीराबाईने एकूण १९९ किलो (८६ व ११३ किलो) वजन पेलले होते, पण चीनच्या झेंग रोंगच्या तुलनेत ती पिछाडीवर राहिली. झेंगनेही एवढेच वजन उचलले होते, पण क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये अधिक वजन पेलल्यामुळे चीनच्या खेळाडूला पदकमिळाले.मीराबाईने अलीकडेच संपलेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.मणिपूरच्या या खेळाडूची नजर आता सप्टेंबरमध्ये होणाºया विश्वचॅम्पियनशिपवर केंद्रित झाली आहे. २०१७ मध्ये तिने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)>‘दुखापतीतून सावरल्यानंतर माझी प्रगती समाधानकारक आहे. मी ईजीएटीमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही हा मान मिळवला. मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे.- मीराबाई चानू