पॅरिस : अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी याच्या जबरदस्त हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोना एफसीने चॅम्पियन्स लीगमध्ये मँचेस्टर सीटीएफसीला ४ -० ने पराभूत केले. तर, अन्य सामन्यात बायर्न म्युनिचने पीएसव्ही आर्इंडहोवनला ४ -१ ने पराभूत केले. गुआर्डिओलाच्या परतण्याने महत्त्वाच्या सामन्यात मेस्सीने फर्नांडिन्होच्या स्लिपवर १७व्या मिनिटात पहिला गोल केला आणि त्यानंतर सामन्यात गोलकीपर क्लोडिओ ब्रावोच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन गोल करीत हॅट्ट्रिक पूर्ण केली. मेस्सीने ६९व्या मिनटाला तिसरा गोल केला आणि युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसरी हॅट्ट्रिक आपल्या नावे केली. ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारने बार्सिलोनासाठी चौथा गोल केला आणि संघाला ४ -० असा विजय मिळवून दिला. स्पॅनिश क्लबचा हा गेल्या ३ सामन्यांतील सलग विजय आहे. या विजयाने ग्रुप सीमध्ये ९ गुणांसोबत अग्रस्थानी आहे. तर, मॅँचेस्टर सिटी ४ गुणांनी दुसऱ्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)- या सामन्यात चिलीचा खेळाडू ब्रावोच्या चुकीने मँचेस्टर सिटीला मोठे नुकसान सहन करावे लागले.तो विनाकारणच बॉक्सच्या बाहेर आला आणि एक खराब पास लुईस सुआरेजला दिला व बॉक्सच्या बाहेरच थांबून त्याने सुआरेजचा पास अडवला. त्यामुळे त्याला रेड कार्ड मिळाले.सामन्यात १० खेळाडूंसह खेळणाऱ्या मँचेस्टर सिटीला बार्सिलोनाच्या तिन्ही स्टार खेळाडूंनी चांगलेच अडचणीत आणले आणि क्लबला सोपा विजय मिळवून दिला.
मेस्सीची हॅट्ट्रिक
By admin | Published: October 21, 2016 1:08 AM