कोण होणार चॅम्पियन : अर्जेटिना-जर्मनी यांच्यात आज रंगणार ‘फायनल फाईट’
रियो दि जानेरो : फुटबॉल जगताचा सम्राट कोण? याचे उत्तर उद्या, रविवारी रात्री येथील माराकाना स्टेडीयमवर मिळणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अर्जेटिना आणि जर्मनी या दोन संघांत रंगणार आहे. अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीला जगातील महान फुटबॉलपटूंच्या पंक्तीत स्थान मिळविण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; पण मेस्सीच्या अर्जेटिना संघाला विश्वचषकादरम्यान जर्मनीच्या ‘वॉल’चा अडथळा आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सवरेत्तम स्पर्धेचा समारोप यजमान ब्राझीलवासीयांच्या मनाप्रमाणो होणार नसला, तरी जर्मनी आणि अर्जेटिना यांच्यादरम्यान उद्या खेळली जाणारी अंतिम लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या लढतीत गोलचा पाऊस पडण्याची शक्यता नाही. जर्मनी आाणि अर्जेटिना संघांना या लढतीच्या निमित्ताने जुना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. सामन्याचा निकाल कुठल्याही बाजूने लागला, तरी अर्जेटिनाचे प्रशिक्षक अलेजांद्रो साबेला यानंतर संघासोबत नसतील हे जवळजवळ निश्चित आहे. अशा परिस्थितीत अर्जेटिना संघाने विजेतेपेद पटकाविले तर साबेला देशवासीयांसाठी ‘हीरो’ ठरतील.
ही केवळ दोन संघांदरम्यान रंगणारी अंतिम झुंज नसून, दोन खंडांदरम्यान (द. अमेरिका व युरोप) वर्चस्वाची लढाई आहे. जर्मनी व अर्जेटिना संघ अंतिम लढतीत तिस:यांदा ‘आमने-सामने’ आहेत. 1986 मध्ये मेक्सिको सिटीमध्ये अर्जेटिनाने जर्मनीचा 3-2 ने पराभव केला होता, तर 199क् मध्ये रोममध्ये पश्चिम जर्मनीने अर्जेटिनाची झुंज 1-क् ने मोडून काढली होती.
अलीकडच्या काही वर्षामध्ये विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अधिक गोल नोंदविले गेलेले नाही. 1986 पासून आतार्पयत खेळल्या गेलेल्या 6 अंतिम सामन्यांत केवळ 27 गोल नोंदविले गेले, तर 199क् पासून 2क्1क् र्पयत केवळ 9 गोल नोंदविले गेले. 199क् मध्ये अर्जेटिना संघ अंतिम लढतीत गोल करण्यात अपयशी ठरलेला पहिला संघ ठरला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीर्पयत खेळल्या गेलेल्या लढतींमध्ये एकूण 167 गोलची नोंद झाली असून, फ्रान्समध्ये 1998 मध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत नोंदविलेल्या गेलेल्या 171 गोलचा विक्रम धोक्यात आहे; पण अंतिम लढतीत गोलचा पाऊस पडण्याची शक्यत कमी आहे. कारण, उभय संघांचा आक्रमणापेक्षा बचावावर अधिक भर राहण्याची शक्यता आहे.
उभय संघांचे गोलकिपर सवरेत्तम फॉर्मात आहेत. जर्मनीचा मॅन्युअल न्यूएर व अर्जेटिनाचा सजिर्यो रोमेरो यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. (वृत्तसंस्था)
रोमेरोने उपांत्य फेरीत हॉलंडविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्ये दोनदा अप्रतिम बचाव करीत आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जर्मनीतर्फे लेफ्ट बॅक बेनेडिक्ट हेविडिसची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून सेंटर बॅक मॅट्स हमल्स व जेरोम बोटेंग यांनी छाप सोडली आहे. जर्मनीचे प्रशिक्षक जोओकिम लो यांनी कर्णधार फिलिप लाम याला मिडफिल्डच्या स्थानावरून राईट बॅकमध्ये स्थान देत बचाव मजबूत केला आहे.
अर्जेटिनाची बचावफळीही मजबूत आहे. अर्जेटिनाने अखेरच्या साखळी सामन्यात नायजेरियाचा 3-2 ने पराभव केल्यानंतर गेल्या तीन सामन्यांत एकही गोल स्वीकारलेला नाही. साबेला संघाचा समतोल कायम राखण्यावर भर देत आहेत. रोमेरोचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. राईट बॅक पेब्लो जबालेटा, सेंटर बॅक एजक्विल गेरे आणि मिडफिल्डर ङोविअर मश्चेरानो यांनीही या स्पर्धेत छाप सोडली आहे. जगातील सवरेत्तम खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या लिओनल मेस्सीची या स्पर्धेतील कामगिरी समाधानकारक ठरली आहे. मेस्सीने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे, पण विश्वविजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न अद्याप त्याला सत्यात उतरविता आलेले नाही. मेस्सीने साखळी फेरीत बोस्निया, इराण आणि नायजेरियाविरुद्ध साखळी फेरीतील तीन सामन्यात तीन गोल नोंदविले, पण बाद फेरीत स्वित्ङरलड, बेल्जियम आणि हॉलंडविरुद्ध त्याला गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. पेले, आंद्रेस इनिस्ता, डिएगो मॅराडोना, जिनेदिन जिदान आणि रोनाल्डो यांनी फुटबॉलच्या सर्वोच्च व्यासपीठावर चमकदार कामगिरी करीत आपले श्रेठत्व सिद्ध केलेले आहे. मेस्सीकडे अंतिम फेरीत जर्मनीविरुद्ध इतिहास नोंदविण्याची संधी आहे.
आतार्पयत स्पर्धेतील वाटचाल
देशअर्जेटिनाजर्मनी
सामने66
गोल केले717
गोल झाले34
स्वयंगोल1क्
फाऊल6471
यलो कार्ड64
रेड कार्डक्क्
अर्जेटिना
फेरीप्रतिस्पर्धीनिकाल
गटसाखळी फेरीबोस्निया2-1 ने विजयी
इराण1-क् ने विजयी
नायजेरिया3-2 ने विजयी
उपउपांत्यपूर्व फेरीस्वीत्ङरलड1-क् ने विजयी
उपांत्यपूर्व फेरीबेल्जियम1-क् ने विजयी
उपांत्य फेरीनेदरलँड4-2ने विजयी (ढ)
जर्मनी
फेरीप्रतिस्पर्धीनिकाल
गटसाखळी फेरी पोतरुगाल4-क् ने विजयी
घाना2-2 ने बरोबरी
अमेरिका1-क् ने विजयी
उपउपांत्यपूर्व फेरीअल्जेरिया2-1 ने विजयी
उपांत्यपूर्व फेरीफ्रान्स1-क् ने विजयी
उपांत्य फेरीब्राझील7-1 ने विजयी
विश्वचषकात आमने-सामने : 6 वेळा अर्जेटिना : 1, जर्मनी : 3, बरोबरी : 2
वर्षयजमान देशफेरीनिकाल
1958स्वीडनगटसाखळीजर्मनी 3-1 ने विजयी
1966इंग्लंडगटसाखळीउभय संघ क्-क् ने बरोबरीत
1986मेक्सिकोअंतिमअर्जेटिना 3-2 ने विजयी
199क्इटलीअंतिमपश्चिम जर्मनी 1-क् ने विजयी
2क्क्6जर्मनीउपांत्यपूर्वजर्मनी पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2ने वि.
2क्1क्द. आफ्रिकाउपांत्यपूर्वजर्मनी 4-क् ने विजयी
4अर्जेटिना संघाला स्वित्ङरलड व बेल्जियमविरुद्ध प्रत्येकी एक गोल नोंदविता आला, तर जर्मनीने गेल्या तीन सामन्यांत 1क् गोल नोंदविले. थॉमस मुलरने साखळी फेरीत पोतरुगालविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदविली. त्याने या स्पर्धेत आतार्पयत पाच गोल नोंदविले आहेत. जर्मनीने या स्पर्धेत एकूण 17 गोल नोंदविले आहेत. मिरास्लोव्ह क्लोसने विश्वचषस स्पर्धेत इतिहासात सर्वाधिक 16 गोल नोंदविण्याची कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्याने दोन गोल केले, तर आंद्रे शुरलने 3, हमल्स व टोनी क्रुस यांनी प्रत्येकी 2, तर मेसुर ओजिल, सामी खेदिरा व मारिया गोएट्ज यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
4जर्मनी संघाला या स्पर्धेत अद्याप अर्जेटिनासारख्या अभेद्य बचाव असलेल्या संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागलेले नाही. 199क् मध्ये विश्वचषक पटकाविणा:या संघाचा कर्णधार लोथर मथारसने आठवडय़ाभरापूर्वी म्हटले होते की, ‘जर्मनीमध्ये एक जुनी म्हण आहे की बचावामुळे जेतेपद पटकाविता येते, तर आक्रमणामुळे प्रशंसा होते.’ त्यामुळे अंतिम लढतीत जर्मनी संघ बचावावर भर देतो की आक्रमणावर, याबाबत उत्सुकता आहे.