रिओ दि जानेरो : फिफा विश्वचषकातील सर्वाेत्कृष्ट खेळाडू म्हणून अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीची निवड झाली. त्याला मिळालेला ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार केवळ मार्केटिंग फंडा आहे, असा आरोप त्यांच्याच देशाचा महान खेळाडू दिएगो माराडोना याने केला आहे. ग्रँड फायनलमध्ये जर्मनीकडून १-० ने पराभूत झाल्यानंतर एका भव्य सोहळ्यात मेस्सीला ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेस्सीने अर्जेन रॉबेन, जेम्स रॉड्रिग्ज आणि नेयमार यांना मागे टाकत पुरस्कारावर नाव कोरले. मेस्सीने सात सामन्यांत चार गोल नोंदवले. बाद फेरीत बार्सिलोनाच्या या स्टार खेळाडूने साजेसा खेळ केला नव्हता. त्यावर माराडोनाने नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षक साबेला यांनी खेळाडूंची बदली योग्य पद्धतीने केली नाही, असा आरोपही माराडोना यांनी केला. (वृत्तसंस्था)
मेस्सीला ‘गोल्डन बॉल’ देण्यात ‘मार्केटिंग फंडा’!
By admin | Published: July 15, 2014 3:43 AM