ऑनलाइन लोकमत
मियामी, दि. ६ - भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या दोघींनी मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सानिया व मार्टिना यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशियाच्या एकातेरिना माकारोवा-एलेना व्हेस्नीना यांचा ७-५, ६-१ असा पराभव केला.
सानिया व हिंगीस यांचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. या दोघींनी दोन आठवड्यांपूर्वीच माकारोवा व व्हेस्नीना या जोडीचाच पराभव करून इंडियन वेल्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.