शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

बलाढ्य मुंबई विजयी मार्गावर

By admin | Published: March 09, 2016 5:26 AM

रणजी विजेत्या मुंबईकरांनी इराणी ट्रॉफी सामन्यावर मजबूत पकड मिळवताना शेष भारत संघाचा डाव ३०६ धावांवर संपुष्टात आणून २९७ धावांची मजबूत आघाडी घेतली.

मुंबई : रणजी विजेत्या मुंबईकरांनी इराणी ट्रॉफी सामन्यावर मजबूत पकड मिळवताना शेष भारत संघाचा डाव ३०६ धावांवर संपुष्टात आणून २९७ धावांची मजबूत आघाडी घेतली. यानंतर फलंदाजीला उतरल्यावर सलामीवीर अखिल हेरवाडकर लगेच परतल्याने मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २ धावा अशी अडखळती सुरुवात केली.ब्रेबॉन स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात अभिषेक नायर (३/३५), जय बिस्ता (२/५२) आणि इक्बाल अब्दुल्ला (२/६२) यांनी केलेल्या टिच्चून माऱ्यापुढे शेष भारताचा डाव मर्यादित राहिला. करुण नायरने झुंजार खेळी करताना संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचे शतक केवळ ६ धावांनी हुकले. १९२ चेंडूंचा सामना करताना करुणने ११ चौकारांसह ९४ धावांची शानदार खेळी केली. त्याचप्रमाणे अखेरच्या फळीमध्ये शेल्डॉन जॅक्सन (३७) आणि जयदेव उनाडकट (४८) यांनी केलेल्या झुंजार खेळीमुळे शेष भारताला ३००ची मजल मारता आली. तसेच अंकित राजपूत गुडघा दुखावल्याने फलंदाजीला न उतरल्यानेही शेष भारताच्या डावावर परिणाम झाला. करुण नायरने चांगली खेळी करीत असताना धवल कुलकर्णीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयश अय्यरकडे झेल दिला. या चुकीमुळे शेष भारताला मोठा फटका बसला. करुण बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. त्याला खालच्या फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली. तिसऱ्या दिवसाची सुरुवात १ बाद ३६ या धावसंख्येवरून करणाऱ्या शेष भारताने ठरावीक अंतराने आपले फलंदाज गमावले. ७ बाद २०१ धावा अशा अवस्थेनंतर करुणने आठव्या विकेटसाठी उनाडकटसह ९१ धावांची भागीदारी केली. अभिषेक नायरने उनाडकटला बाद करून ही जोडी फोडल्यानंतर मुंबईने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले. धवल कुलकर्णी व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक मात्र निर्णायक बळी घेत मुंबईसाठी मोलाचे योगदान दिले.> संक्षिप्त धावफलक :मुंबई (पहिला डाव) : सर्वबाद ६०३ धावा. शेष भारत (पहिला डाव) : ९९.५ षटकांत सर्वबाद ३०६ धावा. (करुण नायर ९४, जयदेव उनाडकट ४८, जयंत यादव ४६, शेल्डॉन जॅक्सन ३७; अभिषेक नायर ३/३५, जय बिस्ता २/५२, इक्बाल अब्दुल्ला २/६२)मुंबई (दुसरा डाव) : ०.४ षटकांत १ बाद २ धावा (अखिल हेरवाडकर १, जय बिस्ता खेळत आहे १; जयंत यादव १/२)