नवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंगची मुलगी आणि प्रसिद्ध गोल्फर जीव मिल्खासिंगची मोठी बहीण सध्या न्यूयॉर्कमधील एका हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारात व्यस्त आहे.मोना मिल्खा सिंग न्यूयॉर्कच्या मेट्रोपोलिटन हॉस्पिटल सेंटरमध्ये डॉक्टर आहे. ती कोरोना रग्णांचा उपचार करीत आहे. अमेरिकत आतापर्यंत या महामारीमुळे ४० हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.चार वेळा युरोपियन टूर चॅम्पियन जीव म्हणाला, ‘ती न्यूयॉर्कमध्ये मेट्रोपोलिटन रुग्णालयात आयसीसी कक्षाची डॉक्टर आहे. ज्यावेळी कुणी कोरोनाची लक्षणे आढळलेला रुग्ण येतो त्यावेळी तिला उपचार करावे लागतात. ती सुरुवीताला रुग्णाची चाचणी घेते. त्यानंतर त्या रुग्णाला विशेष वॉर्डामध्ये पाठवण्यात येते.’५४ वर्षीय मोनाने पतियाळा येथून एमबीबीएसची पदवी घेतली आणि नव्वदीच्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाली. जीव पुढे म्हणाला, ‘मला तिचा अभिमान आहे. ती रोज मॅरेथॉन धावत आहे. ती आठवड्यात पाच दिवस काम करते. कधी दिवसा, कधी रात्री आणि १२-१२ तास. मला तिची चिंता वाटते. रुग्णांचा उपचार करताना काहीही होऊ शकते. आम्ही रोज तिच्यासोबत फोनवर बोलतो. आई-बाबाही रोज तिच्यासोबत बोलतात. मी तिला सकारात्मक राहण्याबाबत व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सल्ला देतो.’जीव पुढे म्हणाला, ‘मी देशातील नागरिकांना आवाहन करतो की कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्यक्तींचा आदर करा. मग ते डॉक्टर असो, पोलीस असो किंवा स्वच्छता कर्मचारी असो. त्यांचा आदर करायला हवा आणि त्यांच्याबाबत चिंता बाळगायला हवी.’ (वृत्तसंस्था)
मिल्खाची मुलगी मोना कोरोनाग्रस्तांच्या उपचारात व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:44 PM