शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘मिशन ११ मिलियन’ मोहीम उपयुक्त : प्रफुल्ल पटेल

By admin | Published: January 21, 2017 5:03 AM

‘मिशन ११ मिलियन’ ही मोहीम भारतीय फुटबॉलला विश्व पातळीवर नवी ओळख निर्माण करुन देण्यात महत्त्वाची ठरेल

नागपूर : भारताच्या यजमानपदाखाली यंदा आयोजित वर्ल्डकप अंडर-१७ फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेली ‘मिशन ११ मिलियन’ ही मोहीम भारतीय फुटबॉलला विश्व पातळीवर नवी ओळख निर्माण करुन देण्यात महत्त्वाची ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’सोबत विशेष संवाद साधताना पटेल म्हणाले, ‘देशात फुटबॉलच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत आहे, यात शंका नाही. खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेला संघाच्या कामगिरीमध्ये उल्लेखनीय सुधारणा होण्याची जोड मिळावी, असे आम्हाला वाटते. किंबहुना ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत. ‘फीफा अंडर-१७ वर्ल्ड कप-२०१७’ याचे आयोजन म्हणजे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘मिशन ११ मिलियन’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.’ पटेल यांची अलीकडे फिफाच्या सर्वांत महत्त्वाच्या वित्त समितीमध्ये निवड झाली आहे.या व्यतिरिक्त त्यांची आशियाई फुटबॉल परिषदेचे (एएफसी) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची धुरा सांभाळत असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची फिफाचे अध्यक्ष जिएनी इन्फॅन्टिनो यांनी प्रशंसा केलेली आहे. भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष ‘मिशन ११ मिलियन’ मोहिमेला देशाच्या फुटबॉलच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानतात. त्यांचे मते ‘भारतात फुटबॉलबाबत विशेष आवड आहे. त्यामुळे अनेक नवे प्रतिभावान खेळाडू समोर येत आहेत, पण आपल्यापुढे महत्त्वाची अडचण म्हणजे, या गुणवान खेळाडूंना दर्जेदार सुविधा प्रदान करण्याची आहे. आर्थिक अडचणीमुळे खेळाडूंना पायभूत सुविधा प्रदान करण्यास अडचण भासत आहे. त्यामुळे शालेय पातळीवर ‘मिशन ११ मिलियन’ ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रासरुट पातळीवर फुटबॉलसाठी नवी प्रतिभा शोधण्यास मदत मिळेल.’ या योजनेला केंद्र सरकारचे समर्थन मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. प्रफुल्ल पटेल म्हणाले,‘सर्वांत आनंदाची बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेमध्ये स्वारस्य दाखविले आहे. आपला खास कार्यक्रम ‘मन की बात’ यामध्ये पंतप्रधानांनी याचा उल्लेख केला आहे. एकूण विचार करता २०१७ हे वर्ष भारतीय फुटबॉलसाठी संस्मरणीय ठरेल.’>काय आहे ‘मिशन ११ मिलियन’भारतीय फुटबॉल महासंघाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात सप्टेंबर २०१६ मध्ये गोवा येथे झालेली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या ३० शहरातील १२ हजार शाळांच्या ११ कोटी १० लाख (१० ते १८ वयोगटातील) विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील क्रीडा मंत्रालयांनाही जोडण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी ही योजना आणखी चांगल्या पद्धतीने राबविण्यास मदत मिळेल. या कार्यक्रमाच्या अखेर प्रत्येक शाळेतील २५ प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी प्रदान करण्यात येणार आहे.>पंतप्रधान मोदी यांनी टिष्ट्वटरवर केले आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वट करीत देशातील युवकांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘मिशन ११ मिलियन मोहीम फुटबॉलसोबत जुळण्याचे राष्ट्रव्यापी आंदोलन आहे. त्यात काश्मीरपासून कन्याकुमारी आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशचे विद्यार्थी या खेळाचा आनंद घेतील.’ पंतप्रधानांनी पालक व शिक्षकांना या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.