नवी दिल्ली : आयपीएलचे माजी वादग्रस्त आयुक्त ललित मोदी यांनी क्रिकेट फिक्सिंगमध्ये सहभाग असलेल्या तीन मोठ्या क्रिकेटपटूंचे नाव उघड करुन खळबळ माजवली आहे. यामध्ये दोन भारतीय व एक वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. या तिघांना रिअल इस्टेट उद्योगपतीने लाच दिल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे.लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मोदी यांनी एक पत्र ट्वीट केले असून, हे पत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सीईओ डेव रिचडर््सन यांना जून २०१३ मध्ये पाठवले असल्याचा दावा केला आहे. शिवाय या पत्रामध्ये त्यांना तथ्य वाटत असेल तर त्यांनी ते पत्र आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा समितीला द्यावे असेही सांगितले. यानंतर मोदी यांनी त्या तीन मोठ्या खेळाडूंचे नाव जाहीर केले. तसेच हा उद्योगपती मोठा सट्टेबाज असल्याचा दावा देखील मोदी यांनी केला आहे.
भ्रष्ट खेळाडूंची माहिती मोदींनी दिली
By admin | Published: June 28, 2015 1:46 AM