शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

मोहम्मद सिराज : ५०० रुपये, ते २.६ कोटी!

By admin | Published: February 21, 2017 12:35 AM

तो पहिला सामना खेळला तेव्हा २० धावा देत नऊ गडी बाद केल्यामुळे मामाने त्याला ५०० रुपये बक्षीस दिले. क्रिकेटचा हा

नवी दिल्ली : तो पहिला सामना खेळला तेव्हा २० धावा देत नऊ गडी बाद केल्यामुळे मामाने त्याला ५०० रुपये बक्षीस दिले. क्रिकेटचा हा पहिला पुरस्कार होता. पण आज आयपीएलच्या दहाव्या पर्वात २.६ कोटी रुपयांचा भाव मिळताच हा खेळाडू स्तब्ध झाला. थोड्या वेळासाठी त्याला हे स्वप्न वाटले. स्वत:ला सावरल्यानंतर मेहनतीचे चीज झाल्याची जाणीव त्याला झाली. मोहम्मद सिराज या खेळाडूचे नाव!वडील मोहम्मद गौस आणि आई शबाना बेगम यांच्यासाठी पॉश एरियात घर विकत घेण्याचे सिराजचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. सिराज वेगवान मारा करतो. या वेगवान गोलंदाजाला स्थानिक सनरायझर्स हैदराबादने २.६ कोटी खर्चून लिलावात खरेदी केले. सिराजला भारत अ आणि शेष भारत संघाकडूनही खेळण्याची संधी मिळाली आहे. आनंदात न्हाऊन निघालेला सिराज म्हणाला, ‘‘क्रिकेटमधील पहिली कमाई मी क्लब सामन्यात केली. माझे मामा संघाचे कर्णधार होते. २५ षटकांच्या त्या सामन्यात मी २० षटकांत प्रतिस्पर्धी संघाचे नऊ फलंदाज बाद केले. मामाने मला ५०० रुपये बक्षीस देताच अतिशय आनंद झाला होता. आज लिलावात मिळालेला भाव पाहून माझे डोळे विस्फारले. माझ्या वालिदसाहेबांनी (वडील) फार संघर्ष केला आहे. ते आॅटोचालक आहेत, पण कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम त्यांनी माझ्यावर आणि माझ्या भावावर होऊ दिला नाही. गोलंदाजीसाठी स्पाईक विकत घ्यायचे तरी मोठी किंमत मोजावी लागते. वडील मात्र माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट स्पाईक आणायचे. आम्ही हलाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोठे झालो. मी कुटुंबासाठी उच्चभ्रूवस्तीत घर खरेदी करू इच्छितो. स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला आहे.’’(वृत्तसंस्था)