शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मोहंमद, अमृता, धर्मेंद्र प्रथम

By admin | Published: January 11, 2016 3:12 AM

मोहंमद मिराज, अमृता पटेल, धर्मेंद्र यादव व कविता यादव यांनी पुणे महापौर चषक राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत आपापल्या वयोगटांत प्रथम क्रमांक मिळविला.

पुणे : मोहंमद मिराज, अमृता पटेल, धर्मेंद्र यादव व कविता यादव यांनी पुणे महापौर चषक राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत आपापल्या वयोगटांत प्रथम क्रमांक मिळविला. महाराष्ट्राच्या पूनम सोनुणेला रौप्य, तर सायली मेंगेला कांस्यवर समाधान मानवे लागले. महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या १६ वर्षांखालील गटातील २ किलोमीटरची शर्यत चुरशीची झाली. दिल्लीच्या मोहंमद मिराजने उत्तर प्रदेशाच्या संदीपकुमारला शेवटच्या २० मीटरमध्ये मागे टाकून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. मुलींच्या १६ वर्षांखालील गटात २ किलोमीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या पूनम सोनुणेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशची अमृता पटेल व पूनम यांच्यामध्ये शेवटच्या ५० मीटरमध्ये चुरस झाली; पण पूनम अमृताला गाठू शकली नाही. पूनमने ही शर्यत ६ मिनिटे ४६.९ सेकंदांत पूर्ण केली. १८ वर्षांखालील मुलींच्या ४ किलोमीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या सायली मेंगेने १५ मिनिटे १८.७ सेकंदांत शर्यत पूर्ण करून कांस्यपदक जिंकले. (क्रीडा प्रतिनिधी)मुले - १८ वर्षांखालील - ६. कि .मी. : धर्मेंद्र यादव (यू.पी. १९ मिनिटे ०९.३ से.), राकेश कुमार यादव (यू.पी. १९ मिनिटे १६.४ से.), सावन बरवाल (हिमाचल प्रदेश १९ मिनिटे २०.३ से.), नझीम पी. (केरळ १९ मिनिटे ५५.० से.), शिरीन जोस, (केरळ १९ मिनिटे ५६.० सेकंद), बहादूर पटेल (दिल्ली २० मिनिटे ३२. ९ से.); मुले १६ वर्षांखालील २ कि.मी. : मोहंमद मिराज (दिल्ली ५ मिनिटे ५९.१ से.), संदीप कुमार (यू.पी. ५ मिनिटे ५९.६ से.), अतुल पुनिया (राजस्थान ५:५९.७ से.), मुकेश यादव (बिहार ५ मिनिटे ५९.९ सें.), प्रदीप कुमार (राजस्थान ६ मिनिटे ०४.१ से), सुभ्भिर (हरियाणा ६ मिनिटे ०४.३ से.);मुली १८ वर्षांखालील ४ कि.मी. : कविता यादव (यू.पी. १४ मिनिटे ३७.४ से.), सविता पाल (यू.पी. १४ मिनिटे ५५ से.), सायली मेंगे (महाराष्ट्र १५ मिनिटे १८. ७ से.) स्वाती वनवाडे (महाराष्ट्र १६.००.१ से.), उषा शर्मा (हरियाणा, १६ मिनिटे ०७.० से.), नुझाहत उस्मान (उत्तराखंड १६ मिनिटे १३.० से.); मुली १६ वर्षांखालील २ कि .मी. : अमृता पटेल (यू.पी. ६ मिनिटे ३९.२ से.), पूनम सोनुणे (महाराष्ट्र ६ मिनिटे ४६.९ से.), अनिता थॉमस (केरळ ७ मिनिटे १७.५ से), मधू (पंजाब ७ मिनिटे २८.१ से), गायत्री जी. (केरळ ७ मिनिटे ३७.१ से.), सुप्रिया मुंडा (पं. बंगाल ७ मिनिटे ४०.४ से).