शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या फलंदाजांचे वर्चस्व

By admin | Published: September 18, 2016 5:34 AM

फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवले.

नवी दिल्ली : पाटा खेळपट्टीवर रोहित शर्मा धावा फटकावण्यात अपयशी ठरला, पण त्याचे मुंबईकर सहकारी कौस्तुभ पवार व सूर्यकुमार यादव यांनी शतके झळकावित फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवले. रोहितला कामगिरीत सातत्य राखता आले नसले, तरी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो भारतीय संघात स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. सराव सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचा दावा मात्र त्याला सादर करता आला नाही.पाटा खेळपट्टीवर रोहितचा अपवाद वगळता पवार (२२८ चेंडू, १०० धावा), यादव (८६ चेंडू, १०३ धावा), सिद्धेश लाड (६२ चेंडू, नाबाद ८६ धावा) व अरमान जाफर (१२३ चेंडू, ६९ धावा) या मुंबईकर फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. कालच्या १ बाद २९ धावसंख्येवरून पुढे खेळताना शनिवारी दुसऱ्या दिवसअखेर मुंबई संघाने पहिल्या डावात ५ बाद ४३१ धावांची मजल मारली होती. न्यूझीलंडने शुक्रवारी पहिल्या दिवशी ७ बाद ३२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला होता. आज मुंबई संघाने ९० षटकांत ४.४६च्या सरासरीने ४०२ धावा फटकावल्या. पाहुण्या संघासाठी आजचा दिवस खडतर ठरला. त्यांच्या गोलंदाजांना उष्ण वातावरणात घाम गाळावा लागला, पण त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. पाटा खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांकडून विशेष अपेक्षा नसली, तरी फिरकीपटूंनाही मात्र अपेक्षित यश लाभले नाही. न्यूझीलंडचे फिरकी त्रिकुट सोढी (२-१३२), मिशेल सँटेनर (१-७१) आणि मार्क क्रेग (६० धावांत बळी नाही) महागडे ठरले. कसोटी मालिकेचा विचार करता भारतासाठी निराशाजनक बाब म्हणजे रोहितचे झटपट बाद होणे. जाफर बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या रोहितला खाते उघडण्यासाठी १० चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली. त्याने लेगस्पिनर ईश सोढीच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत डावाची सुरुवात केली. त्याच्या १८ धावांच्या खेळीत तो एकमेव चांगला फटका होता. सोढीच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत फटका मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टिचित झाला. त्यानंतर खेळपट्टीवर पवारला साथ देण्यासाठी यादव उतरला. (वृत्तसंस्था)यादवने मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेतला. त्याने वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंवरही वर्चस्व गाजवले. त्याने वैयक्तिक अर्धशतक व शतक षटकाराच्या साह्यने पूर्ण केले. यादवच्या शतकी खेळीत ८ षटकार व ९ चौकारांचा समावेश आहे. पवार व यादव यांनी चौथ्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. पवार शतक पूर्ण केल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर लाड व आदित्य तारे (नाबाद ५३) यांनी आक्रमक फलंदाजी केली. शनिवारी कोटलावर षटकार-चौकारांचा पाऊस अनुभवायला मिळाला. (वृत्तसंस्था)>मुंबईने आम्हाला दडपणाखाली आणले : ब्रेसवेलएकमेव सराव सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी मुंबईने ४०२ धावा फटकावत आम्हाला दडपणाखाली आणले, अशी कबुली न्यूझीलंडचा अष्टपैलू वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेल याने दिली. न्यूझीलंडने शुक्रवारी पहिला डाव ७ बाद ३२४ धावसंख्येवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात खेळताना मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ४३१ धावांची मजल मारली. दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ब्रेसवेल म्हणाला, ‘मुंबईच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास त्यांनी आमच्यावर वर्चस्व गाजविले. अद्याप एक दिवसाचा खेळ शिल्लक असून, आम्ही सकारात्मक विचार करीत आहोत. खेळपट्टीवर चेंडू वळत नव्हता. पंडित म्हणाले, ‘रोहितने शतकी खेळी केली असती, तर आनंद झाला असता. त्याचा अपवाद वगळता उर्वरित फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. आम्ही अद्याप डाव घोषित करण्याबाबत विचार केलेला नाही.’ (वृत्तसंस्था)