शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

मुंबई पुन्हा पराभूत

By admin | Published: April 18, 2015 1:18 AM

ड्वेन स्मिथ (६२) आणि ब्रँडन मॅक्युलम (४६) यांनी ४४ चेंडूंत १०९ धावांची धमाकेदार सलामी देताना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध ६ विकेटनी विजयी केले.

रोहित नाईक - मुंबईड्वेन स्मिथ (६२) आणि ब्रँडन मॅक्युलम (४६) यांनी ४४ चेंडूंत १०९ धावांची धमाकेदार सलामी देताना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध ६ विकेटनी विजयी केले. या दोघांच्या धडाक्यामुळे पहिल्या डावात केरॉन पोलार्डने केलेला हल्ला झाकोळला गेला. मुंबईने उभारलेल्या १८३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने २० चेंडू राखून सहज बाजी मारली. चेन्नईचा हा सलग तिसरा विजय असून, यजमान मुंबईला मात्र सलग चौथ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले.स्मिथ आणि मॅक्युलम यांनी सुरुवातीपासून मुंबईकरांवर हल्ला चढवताना चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी ६ षटकांच्या पॉवर प्लेमध्येच तुफानी खेळी करून संघाच्या ९० धावा फलकावर लावल्या आणि येथेच चेन्नईचा विजय जवळजवळ स्पष्ट झाला. स्मिथ आपल्या ताकदवान फटक्यांनी मुंबईची गोलंदाजी फोडून काढत होता, तर दुसऱ्या बाजूलामॅक्युलम बेदरकारपणे मुंबईकरांना चोपत होता. अशा वेळी मुंबईच्या मदतीला धावून आला तो हरभजनसिंग. भज्जीने ८वे षटक टाकताना दुसऱ्या व चौथ्या चेंडूवर अनुक्रमे मॅक्युलम व स्मिथ या स्थिरावलेल्या फलंदाजांना बाद केले. या वेळी मुंबईचे काही प्रमाणात पुनरागमन करताना चेन्नईला रोखण्याचा प्रयत्न केला. स्मिथने ३० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार खेचताना आक्रमक ६२ धावा काढल्या. तर, मॅक्युलमने केवळ २० चेंडूंत ६ खणखणीत चौकारांसह २ षटकार मारून ४६ धावा कुटल्या. सुरेश रैना (नाबाद ४३) आणि फाफ डुप्लेसीस (११) यांनी चेन्नईचा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. १३व्या षटकांत लसिथ मलिंगाने शानदार यॉर्करवर प्लेसीसचा त्रिफळा उडवून मुंबईला तिसरे यश मिळवून दिले. यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी (३)देखील पोलार्डच्या गोलंदाजीवर लगेच परतल्याने चेन्नईची अवस्था ४ बाद १६६ अशी झाली. मात्र, विजयाचे लक्ष्य आवाक्यात असल्याने चेन्नईला त्याचे फारसे दडपण नव्हते आणि दुसऱ्या बाजूला टिकून असलेल्या रैनाने अखेरपर्यंत किल्ला लढवीत चेन्नईला विजय मिळवून दिला. रैनाने २९ चेंडंूत ४ चौकार व २ षटकारांसह आपली खेळी सजवली.तत्पूर्वी, यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयाच्या शोधात शुक्रवारी वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात ‘नेहमीप्रमाणे’ अडखळतच झाली. मात्र, कर्णधार रोहित शर्मा (५०), केरॉन पोलार्ड (६४) आणि अंबाती रायुडू (२९) यांच्या जोरावर मुंबईने तगड्या चेन्नईसमोर ७ बाद १८३ धावा उभारल्या.नाणेफेक जिंकून मुंबईने फलंदाजी स्वीकारली. पहिल्याच षटकात आशिष नेहराने सलामीवीर पार्थिव पटेलला बाद करून मुंबईला झटका दिला. यानंतर धडाकेबाज कोरे अँडरसन आणि लेंडल सिमेन्सदेखील पाठोपाठ परतल्याने मुंबईची ३.४ षटकांत ३ बाद १२ अशी केविलवाणी अवस्था झाली. या वेळी हरभजनसिंगच्या आगमनाने संपूर्ण स्टेडियममध्ये जोश भरला. भज्जीने आक्रमक फटके खेळत आपला इरादा स्पष्ट केला. १०व्या षटकात मोहित शर्माने भज्जीला बाद केले. भज्जीने २१ चेंडंूत २ चौकार व एक षटकार खेचून २४ धावा फटकावल्या. यानंतर आक्रमणाची सर्व सूत्रे स्वीकारली ती पोलार्डने. सलग दुसऱ्या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावताना पोलार्डने मुंबईला सावरले. त्याने शर्मासोबत पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. नेहराने शर्माला बाद करून ही जोडी फोडली. शर्माने ३१ चेंडूत ५ चौकार व एक षटकार खेचताना ५० धावा केल्या.यानंतर अंबाती रायुडूने पोलार्डला उपयुक्त साथ देताना सहाव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करून मुंबईला आव्हानात्मक मजल मारून दिली. रायडूने १६ चेंडूंत एक चौकार व ३ षटकार मारून २९ धावा काढल्या, तर पोलार्डने ३० चेंडूंत ६४ धावा कुटताना ४ चौकार व ५ षटकारांचा नजराणा पेश केला.