चेन्नई : गतलढतीत दिल्लीकडून 4-1 असा पराभव पत्करावा लागल्याने मनोबल खचलेल्या चेन्नईयन संघाविरुद्ध मंगळवारी मुंबई सिटी संघ भिडणार आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पध्रेत विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चढाओढ रंगणार आहे. गुणतालिकेवर नजर टाकल्यास चेन्नई तिस:या क्रमांकावर असून, मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे.
चेन्नईयन जरी त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार असले, तरी दिल्लीकडून मानहानीकारक पराभवाने त्यांचा आत्मविश्वास खचला आहे. बोजान जॉर्डजिक याच्या नेतृत्वाखाली खेळणा:या चेन्नईयन संघाची विजयी घोडदौड दिल्लीने रोखली, तर मुंबईची गाडी काहीशी चाचपडत पुढे सरकत आहे. घरच्या मैदानावरील पहिल्याच लढतीत पुणो सिटीचा 5-क् असा धुव्वा उडवत मुंबईने विजयाची चव चाखली खरी; परंतु सातत्य राखण्यात अपयश आल्याने नॉर्थ युनायटेडने त्यांना 2-क् असे पराभूत करून जमिनिवर आणले. मुंबईसाठी एक आनंदाची बाब म्हणजे स्टार स्ट्रायकर निकोलस अनेल्का आणि कर्णधार सय्यद रहिम नबी हे चेन्नईविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. अनेल्कावर तीन सामन्यांची बंदी घातल्याने तो आयएसएलमध्ये आत्तार्पयत खेळू शकला नाही, तर नबीला पहिल्याच लढतीत दुखापत झाली होती. अनेल्का मंगळवारच्या लढतीत खेळल्यास चेन्नईयनच्या बचावफळीची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. दिल्लीने याच ढिसाळ बचावाचा फायदा उचलत चेन्नईयनला पराभूत केले होते आणि मुंबई संघाकडूनही त्याच्याच पुनरावृत्तीची अपेक्षा आहे.
चेन्नईयन संघाकडे इटालियन वल्र्डकप विजेता मार्को माटेराज्जी याच्यासारखा आक्रमक आणि ब्राङिालियनचा एलानो ब्लमर हे खेळाडू असल्याने ते कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतात. मुंबईकडेन अॅण्ड्रे मॉरित्झ ही गोलमशीन असल्याने त्यांच्याकडूनही सडेतोड उत्तराची अपेक्षा आहे. मॉरित्झने पुण्याविरुद्ध सर्वाधिक तीन गोलची नोंद केली होती. नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध तो 9क् मिनिटे खेळू शकला नव्हता. त्यामुळे चेन्नईयन विरुद्ध तो 9क् मिनिटे खेळून संघाला विजय मिळवून देईल अशी आशा आहे.