शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

मुंबई चेन्नई, चॅम्पियन कोण?

By admin | Published: May 24, 2015 1:20 AM

चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल-८ च्या चॅम्पियन्सपदाच्या अंतिम लढतीत रविवारी ईडन गार्डनवर मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन हात करणार आहे.

आयपीएल-८ : आज ईडनवर रंगणार अंतिम सामनाकोलकाता : दोन वेळेचा माजी विजेता आणि आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ गणला जाणारा चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल-८ च्या चॅम्पियन्सपदाच्या अंतिम लढतीत रविवारी ईडन गार्डनवर मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन हात करणार आहे. यासोबतच ४७ दिवस गाजलेल्या या टी-२० मनोरंजक क्रिकेट महोत्सवाचा समारोपदेखील होईल.दोन वर्षांआधी स्पॉट फिक्सिंग प्रकरण चव्हाट्यावर येताच चेन्नई संघ वादाच्या भोवऱ्यात अडकला. यंदा पाच लाखांचेच मूल्यांकन दाखवीत अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर हा संघ आला. या प्रकरणाचा मात्र यंदाच्या स्पर्धेवर काहीही विपरीत परिणाम झाला नाही, हे विशेष. तरीही हे सत्र पूर्णपणे नाट्यमय घडामोंडीपासून अलिप्त राहिले असे नाही. एका सट्टेबाजाने खेळाडूंसोबत साधलेला संपर्क, मैदानावरील शाब्दिक चकमक आणि प्रोटोकॉल मोडल्याच्या घटना पुढे आल्याच. दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघाने आपली चांगली कामगिरी सुरूच ठेवली. मुंबई इंडियन्सने दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर चेन्नईला तिसऱ्या जेतेपदापासून वंचित ठेवले होते. आता वचपा काढण्याची चेन्नईकडे चांगली संधी असेल. गुणतालिकेत अव्वल राहिलेला चेन्नई संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबईकडून २५ गुणांनी पराभूत झाला होता. पण, काल दुसरी क्वालिफायर जिंकून या संघाने सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली. रांची येथे रॉयल चॅलेंजर बंगळुरुला तीन गड्यांनी धूळ चारणारा चेन्नई जबर फॉर्ममध्ये आहे. मुंबईला मात्र चार दिवस विश्रांती मिळाली असल्याने त्यांनी चेन्नईला कमी लेखू नये. चेन्नईने आपल्या संघात फारसे बदल केले नाहीत. सिनियर्स फॉर्ममध्ये आहेत आणि धोनी ‘टच’मुळे त्यांच्यात विजयाची भूक जाणवते. आरसीबीविरुद्ध तीन बळी घेत सामनावीर किताब जिंकणाऱ्या आशिष नेहराने २२ बळी घेतले, तर ४० व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या मायकेल हसीने ५६ धावा ठोकल्या. याच मैदानावर २०१३ साली एकमेव जेतेपद घेणाऱ्या मुंबईने सध्याच्या स्पर्धेत खराब कामगिरीतून वाटचाल करीत अंतिम फेरीपर्यंतचा मार्ग सुकर केला. अखेरचे आठपैकी सात सामने त्यांनी जिंकले होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ‘करा किंवा मरा’ अशी स्थिती असताना रोहित शर्माच्या मुंबईने त्यांना ११३ धावांत गुंडाळून सामना सहा गड्यांनी सहजरीत्या जिंकला होता. रोहितसाठी हे मैदान लकी म्हणावे लागेल. त्याने लंकेविरुद्ध येथे मागच्यावर्षी २६४ धावा ठोकल्या होत्या. सिमन्स व पार्थिव हेदेखील धावांचे योगदान देत आहेत. मुंबईचा हा तिसरा अंतिम सामना असून, मागच्या दोन्ही वेळेस त्यांची गाठ चेन्नईविरुद्ध पडली होती. २०१० मध्ये मुंबईचा चेन्नईने २२ धावांनी पराभव केला, पण २०१३ मध्ये मुंबईने सामना २३ धावांनी जिंकला.(वृत्तसंस्था)फिरकीपटूंना साथ देणाऱ्या ईडनच्या खेळपट्टीवर भारताच्या दोन अव्वल फिरकीपटूंमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. कसोटी संघात पुनरागमन करणारा हरभजनसिंग आणि चेन्नई संघात असलेला आर. अश्विन यांच्या फिरकीची कमाल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.मुंबईला सुरुवातीला यश मिळवून देण्याची जबाबदारी लसिथ मलिंगाच्या खांद्यावर असेल. दुसरीकडे चेन्नईचे वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्हो आणि नेहरा हेदेखील निकाल फिरवू शकतात.मुंबई-चेन्नईची अनोखी हॅट्ट्रिक...चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आयपीएलच्या इतिहासात स्वत:चा दबदबा निर्माण करताना सर्वाधिक ६व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे मुंबईला विजेतेपदासाठी तिन्ही वेळेला चेन्नईचाच सामना करावा लागला. २०१० साली या दोन संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने २२ धावांनी बाजी मारली होती. तर २०१३ साली मुंबईने याचा वचपा काढताना चेन्नईला नमवून विजेतेपद पटकावले. आता तिसऱ्यांदा या दोन संघांमध्ये अंतिम सामना होत असून कोण वरचढ ठरणार याची उत्सुकता लागली आहे.मुंबई इंडियन्स किरॉन पोलार्ड ४संघाचा हुकमी खेळाडू. कोणत्याही क्षणी कोणताही सामना फिरवण्याची क्षमता.४यंदाची कामगिरी : १५ सामने ३८३ धावा व ३ बळीहरभजन सिंग४दिर्घ अनुभव असलेल्या खेळाडू. प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्णायक कामगिरी करण्याची क्षमता४यंदाची कामगिरी : १४ सामने १११ धावा व १६ बळीचेन्नई सुपरकिंग्जड्वेन ब्रावो४संघाचा महत्त्वाचा खेळाडू. गोलंदाजीमध्ये फलंदाजांना जखडवून ठेवून बाद करण्यात हातखंडा. फलंदाजीमध्ये कोणत्याही क्षणी फटकेबाजी करु शकतो.४यंदाची कामगिरी: १६ सामने १८६ धावा व २४ बळीरवींद्र जडेजा४प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला खीळ लावण्याची क्षमता. एकदा बहरात आल्यास प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजी करणे कठीण. शिवाय खालच्या फळीमध्ये फलंदाजीला येऊन आक्रमक खेळीच्या जोरावर सामना फिरवण्याची क्षमता.४यंदाची कामगिरी: १६ सामने १२१ धावा व ११ बळीफलंदाजलैंडल सिमेन्स (मुंबई) १२ सामने ४७२ धावारोहित शर्मा (मुंबई) १५ सामने ४३२ धावाकिरॉन पोलार्ड (मुंबई) १५ सामने ३८३ धावाफाफ डू प्लेसिस (चेन्नई) १६ सामने ३७९ धावामहेंद्रसिंग धोनी (चेन्नई) १६ सामने ३५४ धावासुरेश रैना (चेन्नई) १६ सामने ३४६ धावा गोलंदाजड्वेन ब्रावो (चेन्नई) १६ सामने २४ बळीआशिष नेहरा (चेन्नई) १५ सामने २३ बळीमोहित शर्मा (चेन्नई) १५ सामने १३ बळीलसिथ मलिंगा (मुंबई)१४ सामने २२ बळीहरभजन सिंग (मुंबई) १४ सामने १६ बळीमिचेल मॅक्क्लेनघन (मुंबई) ११ सामने १५ बळीइतिहासाची पुनरावृत्ती होणार?दोन वर्षांपुर्वी म्हणजेच २०१३ सालच्या आयपीएल स्पर्धेत २६ मेला इडन गार्डन मैदावरच झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जला नमवून पहिल्यांदा विजेतेपद उंचावले होते. त्यावेळी क्वालिफायरमध्ये चेन्नईने मुंबईला धक्का देत थेट अंतिम फेरी गाठली होती. तर यंदा मुंबईने क्वालिफायरमध्ये चेन्नईचा धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास...९ एप्रिल : दिल्ली विरुध्द १ धावेने विजय११ एप्रिल : हैदराबाद विरुध्द ४५ धावांनी विजय१७ एप्रिल : मुंबई विरुध्द ६ विकेट्सने विजय१९ एप्रिल : राजस्थान विरुध्द ८ विकेट्सने पराभव२२ एप्रिल : बंगळुरु विरुध्द २७ धावांनी विजय२५ एप्रिल : पंजाब विरुध्द ९७ धावांनी विजय२८ एप्रिल : कोलकाता विरुध्द २ धावांनी विजय३० एप्रिल : कोलकाता विरुध्द ७ विकेट्सने पराभव२ मे : हैदराबाद विरुध्द२२ धावांनी पराभव४ मे : बंगळुरुविरुध्द२४ धावांनी विजय८ मे : मुंबई विरुध्द६ विकेट्सने पराभव१० मे : राजस्थान विरुध्द१२ धावांनी विजय१२ मे : दिल्ली विरुध्द६ विकेट्सने पराभव१६ मे : पंजाब विरुध्द७ विकेट्सने विजय१९ मे (क्वालिफायर १) : मुंबई विरुध्द २५ धावांनी पराभव२२ मे (क्वालिफायर २) : बंगळुरु विरुध्द ३ विकेट्सने विजयमुंबई इंडियन्स८ एप्रिल : कोलकाता विरुध्द ७ विकेट्सने पराभव१२ एप्रिल : पंजाब विरुध्द १८ धावांनी पराभव१४ एप्रिल : राजस्थान विरुध्द ७ विकेट्सने पराभव१७ एप्रिल : चेन्नई विरुध्द ६ विकेट्सने पराभव१९ एप्रिल : बंगळुरु विरुध्द १८ धावांनी विजय२३ एप्रिल : दिल्ली विरुध्द ३७ धावांनी पराभव२५ एप्रिल : हैदराबाद विरुध्द २० धावांनी विजय१ मे : राजस्थान विरुध्द ८ धावांनी विजय३ मे : पंजाब विरुध्द २३ धावांनी विजय५ मे : दिल्ली विरुध्द ५ विकेट्सने विजय८ मे : चेन्नई विरुध्द ६ विकेट्सने विजय१० मे : बंगळुरु विरुध्द ३९ धावांनी पराभव१४ मे : कोलकाता विरुध्द ५ धावांनी विजय१७ मे : हैदराबाद विरुध्द ९ विकेट्सने विजयमुंबईचा कर्णधार पुन्हा तळपणार?इडन गार्डन्स मैदान कायमच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी लकी ठरले आहे. याच मैदानावर त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च २६४ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारली होती. शिवाय यंदाच्या सत्रातील सलामीचा सामना कोलकाताविरुध्द याच मैदानावर खेळताना त्याने नाबाद ९८ धावांची खेळी खेळली होती. तरी देखील मुंबईला या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.१३१ आयपीएल इतिहासामधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत एकूण १३१ सामने खेळले असून ७९ सामन्यांत विजय मिळवताना ५० सामने गमावले आहेत. तर एक सामना टाय झाला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. या संघाची यशाची टक्केवारी सर्वाधिक ६१.१५% अशी आहे.१२५ दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सने एकूण १२५ सामने खेळताना ७२ सामन्यात बाजी मारताना ५३ सामन्यांत पराभव पत्करला आहे. मुंबईच्या विजयाची टक्केवारी ५७.६०% चेन्नई नंतर मुंबईची कामगिरी सर्वोत्तम आहे.रोहित शर्मा (कर्णधार), अंबाती रायुडू, अभिमन्यू मिथुन, आदित्य तारे, पार्थिव पटेल, किरोन पोलार्ड, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, जसप्रीत बुमरा, मर्चेट डि लांगे, पवन सुयाल, श्रेयस गोपाल, लेंडल सिमन्स, प्रज्ञान ओझा, मिशेल मॅक्लेनगन, एडेन ब्लिझार्ड, अक्षय वखरे, नितीश राणा, सिद्धेश लाड, हार्दिक पांड्या, जगदीशा सुचित, उन्मुक्त चंद, बेन हिल्फेन्हास, कोलिन मुन्रो आणि आर. विनय कुमार. महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), आशिष नेहरा, बाबा अपराजित, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, फाफ डुु प्लेसिस, ईश्वर पांडे, मॅट हेन्री, मिथुन मन्हास, मोहित शर्मा, पवन नेगी, आर अश्विन, रवींद्र जडेजा, सॅम्युअल्स बद्री, सुरेश रैना, रोनित मोरे, मायकेल हसी, राहुल शर्मा, काइल एबोट, अंकुश बैस, इरफान पठाण, प्रत्युष सिंग, अँंड्र्यू टाये आणि एकलव्य द्विवेदी.