शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

मुंबईने वॉरियर्सला नमवले

By admin | Published: January 03, 2016 1:40 AM

यजमान मुंबई रॉकेट्सने प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) स्पर्धेत शानदार विजयी सलामी देताना भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या नेतृत्त्वाखालील अवध वॉरियर्सला

मुंबई : यजमान मुंबई रॉकेट्सने प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) स्पर्धेत शानदार विजयी सलामी देताना भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या नेतृत्त्वाखालील अवध वॉरियर्सला २-१ असे नमवले. वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) स्टेडियममध्ये झालेल्या या पहिल्याच सामन्यात अपेक्षेप्रमाणे ‘ट्रम्प मॅच’ सर्वाधिक लक्षवेधी आणि निर्णायक ठरली. मुंबईने पाच लढतींच्या सामन्यात ३ तर अवधने २ लढती जिंकल्या. मात्र दोन्ही संघांनी आपआपले ट्रम्प मॅच गमावल्याने प्रत्येकी २ गुणांचा फटका बसला. त्यामुळे मुंबईने अखेर २-१ अशी बाजी मारली. त्याचवेळी ऐनवेळी कर्णधार सायनाला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याचा मोठा फटकाही अवध संघाला बसला. आरएमव्ही गुरुसाईदत्तने यजमानांना शानदार विजयी सुरुवात करुन दिली. त्याने पुरुष एकेरी लढतीत अवधच्या बी. साई प्रणीतचे कडवे आव्हान १४-१५, १५-१०, १५-८ असे परतावले. महिला एकेरीत मुंबईच्या रुत्विका गादेने अवधच्या जी. वृशालीचा १५-१३, १५-१० असा धुव्वा उडवला. यानंतर पुरुष दुहेरीत मुंबईच्या व्लादीमीर इवानोव्ह - मथायस बोए या बलाढ्य जोडीने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना अवध्यच्या केई युन - हेंद्रा गुनावन यांचा १५-११, १५-११ असा फडशा पाडला. ही लढत अवधची ट्रम्प लढत होती. मात्र यामध्ये मुंबईकरांनी बाजी मारली. तर यानंतर आपल्या ट्रम्प लढतीचा वचपा काढताना अवधच्या तानोंगसाक सेनसोमबूनसुक ने पुरुष एकेरीच्या लढतीत बलाढ्य एचएस प्रणयला १५-१२, १४-१५, १५-१४ असा धक्का दिला. ही लढत मुंबईची ट्रम्प लढत होती. (क्रीडा प्रतिनिधी)फुलराणी सायना नेहवालची माघारगतमोसमात दुखापतींमुळे प्रमुख स्पर्धेत फटका बसलेल्या सायना नेहवालला पीबीएलच्या पहिल्याच सामन्यात धक्का बसला. पायाला झालेल्या दुखपतीमुळे तीने कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेत रॉकेट्सविरुध्दच्या सामन्यातून माघारी घेतली. या सामन्यासाठी मुख्य आकर्षण असलेली ‘फुलराणी’च खेळणार नसल्याचे समजल्यावर प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली. आॅलिम्पिक वर्ष असल्याने कोणताही धोक पत्करणार नसल्याचे सांगताना सायना म्हणाली की, काही आठवड्यांपूर्वी माझ्या पायाला दुखापत झालेली. ही दुखापत गंभीर असून मी यातून सावरत आहे. आम्हाला अजून पाच सामने खेळावयाचे असून दुखापतीतून सावरल्यानंतर मी नक्की खेळेल. आम्ही या लीगमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करु.कोर्टवर बॉलिवूडचा तडका; जॅकलिनचे अप्रतिम नृत्यबॉलिवूडच्या रंगतदार तडक्याने पीबीएलचा शानदार उद्घाटन सोहळा रंगला. जागतिक बॅडमिंटन खेळाडूंसह बॉलिवूड स्टार्स कोर्टवर पाहायला मिळाल्याने सोहळा जबरदस्त रंगला. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने अप्रतिम नृत्य करताना स्टेडियममधील हजारो प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवले. त्याचवेळी प्रसिध्द संगीतकार समीम - सुलेमान या जोडीने आपल्या म्युझिकचा डबल धमाका सादर केला. याव्यतिरीक्त रोशनाईचा झगमगाट आणि प्रेक्षकांचा मिळालेला मोठा प्रतिसाद यामुळे एनएससीआयचे स्टेडियम दणाणून गेले.