ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 29 - आयपीएलच्या सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सवर पाच धावांनी विजय मिळविला. अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांनी २० षटकांत प्रत्येकी 153 धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. मुंबई इंडियन्सने केलेल्या दोन बाद 11 धावांचा पाठलाग करताना गुजरात लायन्सने सहा धावा केल्या. यावेळी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज बुमराहने गुजरात लायन्सला गुमराह केले.
सुपर ओव्हरपूर्वी दोन्ही संघांनी २० षटकांत प्रत्येकी 153 धावा केल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज पार्थिव पटेल याने शानदार फटकेबाजी करत सर्वाधिक जास्त धावा केल्या. या सामन्यात पार्थिव पटेलने 44 चेंडूत एक षटकार आणि 9 चौकारांची खेळी करत 70 धावा केल्या. जोस बटलर (9), नितीश राणा (19) , रोहित शर्मा (9), पोलार्ड (15), कृणाल पांड्या नाबाद 8 धावा केल्या.
याआधी नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्यास मैदानात उतरलेल्या गुजरात लायन्सने 20 षटकात 9 बाद 153 धावा केल्या होत्या. गुजरात लायन्सकडून फलंदाज इशान किशन याने सर्वाधिक जास्त धावा केल्या. इशान किशनने 35 चेंडूत 48 धावा केल्या. मॅक्युलम (6), रैना (1) फिंच (0) दिनेश कार्तिक(2) जडेजा (28), जेम्स फॉल्कनर (21), इरफान पठाण (2) आणि अॅंड्रू टायने नाबाद 25 धावा केल्या. तर, गोलंदाज बासिल थम्पीने तीन, जेम्स फॉल्कनर दोन आणि अंकित सोनीने एक बळी घेतला. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाज कृणाल पांड्याने तीन बळी घेतले. बुमराह आणि मलिंगाने प्रत्येकी दोन आणि हरभजनसिंगने एक बळी टिपला.