शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मुंबई इंडियन्सचे लक्ष्य केकेआरविरुद्ध विजयाचे

By admin | Published: April 13, 2016 3:04 AM

आयपीएलच्या नवव्या सत्रात सलामीला पुणे रायझिंग सुपर जॉयन्टस्कडून नऊ गड्यांनी सपाटून मार खाल्ल्यानंतर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला आज बुधवारी

कोलकाता : आयपीएलच्या नवव्या सत्रात सलामीला पुणे रायझिंग सुपर जॉयन्टस्कडून नऊ गड्यांनी सपाटून मार खाल्ल्यानंतर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला आज बुधवारी त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करीत विजयी वाटेवर परतण्यासाठी कंबर कसली आहे.केकेआर आणि मुंबईची स्पर्धेतील सुरुवात वेगवेगळ्या तऱ्हेने झाली. नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला नऊ गड्यांनी नमविले, तर मुंबईचा नऊ गड्यांनीच पुण्याकडून पराभव झाला. केकेआरचा हुकमी एक्का विंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण आहे. तो वडिलांच्या निधनानंतर संघात परतला. आयसीसीने त्याची गोलंदाजी शैली योग्य ठरविली. ४५ वर्षांचा ब्रॅड हॉग याच्यासोबत फिरकी गोलंदाजीचा समन्वय केकेआरकडे आहे. त्यासाठी अंतिम एकादशमध्ये नारायण आणि हॉगला संधी द्यावी लागेल. नारायणने चार सत्रांत ७४ गडी बाद केले होते. दुसरीकडे पहिल्या सामन्यात १९ धावांत दिल्लीचे तीन गडी बाद करणारा हॉगदेखील खेळण्यासाठी सज्ज आहे. दोन फिरकी गोलंदाज खेळवायचे झाल्यास कर्णधार गंभीर जॉन हेस्टिंग्सला बाहेर ठेवेल. (वृत्तसंस्था)कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, शकीब अल् हसन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, मनीष पांडे, जयदेव उनाडकट, जॉन हेस्टिंग्ज, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कुलदीप यादव, कॉलिन मन्रो, शेल्डन जॅक्सन, जॉन हेस्टिंग्ज, जेसन होल्डर, ब्रॅड हॉग, मनन शर्मा, राजगोपाल सतीश व सूर्यकुमार यादव.मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, लेंडल सिमन्स, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लनघन, अक्षय वाखरे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जे. सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या व जितेश शर्मा.