शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

मुंबईने हातातील विजेतेपद गमावले

By admin | Published: March 11, 2016 2:58 AM

सलामीवीर फैझ फझलचे (१२७) शतक, करुण नायर (९२), सुदीप चॅटर्जी (५४), शेल्डॉन जॅक्सन (नाबाद ५९) आणि स्टुअर्ट बिन्नी (५४) यांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी या जोरावर शेष भारतने

मुंबई : सलामीवीर फैझ फझलचे (१२७) शतक, करुण नायर (९२), सुदीप चॅटर्जी (५४), शेल्डॉन जॅक्सन (नाबाद ५९) आणि स्टुअर्ट बिन्नी (५४) यांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी या जोरावर शेष भारतने रणजी विजेत्या मुंबईने दिलेले ४८० धावांचे अशक्यप्राय आव्हान पार करून विक्रमी विजयासह इराणी ट्रॉफीवर कब्जा केला. शेष भारतने ६ फलंदाजांच्या मोबदल्यात ४८२ धावा फटकावत शानदार विजेतेपद पटकावले.ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात संघाला विक्रमी विजेतेपद मिळवून देताना फझलने २८० चेंडूंत १० चौकारांसह १२७ धावांची संयमी खेळी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. सुदीपने १०९ चेंडूंत ५ चौकारांसह आपली खेळी सजवली. यानंतर मधल्या फळीमध्ये करुण नायरने १३२ चेंडूंत ७ चौकारांसह ९२ धावा फटकावून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. तर शेवटच्या फळीत जॅक्सन (७६ चेंडूंत नाबाद ५९) व बिन्नी (५१ चेंडूंत ५४) यांनी फटकेबाजी करताना मुंबईच्या हातातील विजेतेपद हिसकावून घेतले. पाचव्या व अखेरच्या दिवशी १ बाद १०० वरून सुरुवात करत शेष भारतने सावध खेळ केला. फझल-सुदीप यांनी ११० धावांची भागीदारी केली. यानंतर फझलने नायरसह निर्णायक १३० धावांची भागीदारी करून मुंबईकरांवर दडपण टाकले. नायर आणि कर्णधार नमन ओझा १७ धावांच्या अंतराने बाद झाल्याने मुंबईकरांना पुनरागमनाची संधी मिळाली, मात्र यानंतर जॅक्सन आणि बिन्नी यांनी एकदिवसीय सामन्याप्रमाणे हल्ला करताना मुंबईकरांची गोलंदाजी फोडून संघाला विक्रमी विजेतेपद पटकावून दिले. मुंबईकडून इक्बाल अब्दुल्लाचा अपवाद वगळता इतर सर्व गोलंदाज अपयशी ठरले. अब्दुल्लाने १५४ धावांच्या मोबदल्यात शेष भारतचा अर्धा संघ बाद केला. मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून साथ मिळाली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक : मुंबई : पहिला डाव - सर्व बाद ६०३ धावा आणि दुसरा डाव - सर्व बाद १८२ धावाशेष भारत : पहिला डाव - सर्व बाद ३०६ धावा आणि दुसरा डाव - १२९.४ षटकांत ६ बाद ४८२ धावा (फैझ फझल १२७, सुदीप चॅटर्जी ५४, करुण नायर ९२, शेल्डॉन जॅक्सन नाबाद ५९, स्टुअर्ट बिन्नी ५४; इक्बाल अब्दुल्ला ५/१५४)