लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुबंई नॉर्थ संघाने मुला-मुलींच्या गटात नागपूर संघाचा पराभव करून ३४व्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा १६ वर्षांखालील गटात (यूथ) बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला. पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने इंदिरा नॅशनल स्कूलच्या कोर्टवर नुकताच झालेल्या या स्पर्धेतील मुलांच्या अंतिम लढतीत अर्जुन यादव (२१), दिलीप हरीजान (२५) आणि कमलेश राजभोर (२०) यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मुंबई नॉर्थ संघाने नागपूरला ८०-७४ गुणांनी नमवून विजेतेपदावर कब्जा केला. पराभूत नागपूर संघाकडून रावेल बोमनवार (२७), वरुण अहुजा (९) व सुमीत जोशी (१६) यांनी चांगली झुंज दिली. मध्यंतराला मुंबई नॉर्थ ४ गुणांनी (३०-३४) पिछाडीवर होता. मात्र, यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना त्यांनी थेट जेतेपदाला गवसणी घातली. सामनावीराचा मान अर्जुन यादवला मिळाला. दुसरीकडे, मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई नॉर्थने नागपूरला ६७-६५ असे अवघ्या दाने गुणांनी पराभूत करून जेतेपद जिकंले. विजयी संघाकडून सुझान पिंटो (२९), तनिष्का मालवणकर (१३), उर्वी डी. (१२), अरूइया मस्कारनस (७) यांनी निर्णायक गुण मिळवले. नागपूरकडून आबा लाड (२७), सिया देवधर (२२), पूर्वी महाले (८) व देवश्री आंबेगावकर (४) यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला.
मुंबई नॉर्थ संघाला दुहेरी मुकुट
By admin | Published: May 08, 2017 3:51 AM