नवी दिल्ली : कॅरेबियनस्टार फलंदाज लेंडल सिमन्स आणि किरॉन पोलार्ड यांच्या स्फोटक खेळीनंतर गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्सने आयपीएल लढतीत शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १४६ धावांनी धुव्वा उडवला. या विजयाबरोबरच दिल्लीचा संघ प्लेआॅफच्या शर्यतीतून बाद झाला आहे.या विजयामुळे मुंबईचा संघ आयपीएल दहाव्या पर्वात प्लेआॅफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. गत सामन्यात गुजरात लायन्सवर शानदार विजय नोंदवणारे दिल्लीचे फलंदाज आणि गोलंदाज या सामन्यात मात्र पूर्णपणे फ्लॉप ठरले.पोलार्ड आणि सिमन्स यांच्या फटकेबाज खेळीच्या बळावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने ३ बाद २१२ अशी विशाल धावसंख्या रचली. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या १३.४ षटकांत ६६ धावांत ढेपाळला. या विजयानंतर मुंबईने त्यांचे अव्वल स्थान मजबूत करताना ११ सामन्यांत १८ गुण केले आहेत, तर दिल्लीचे ११ सामन्यांत फक्त ८ गुण असून, ते सहाव्या स्थानावर आहेत. त्यामुळे त्यांच्या प्लेआॅफच्या आशा जवळपास उद्ध्वस्त झाल्या आहेत. धावांच्या अंतराचा विचार करता हा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. दिल्लीकडून करुण नायरने सर्वाधिक २१ धावा केल्या. मुंबईकडून हरभजनसिंग आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.तत्पूर्वी, सलामीवीर पार्थिव पटेल (२५) आणि सिमन्स (६६) यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून देताना ५२ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. विशेषत: सिमन्सने आक्रमक फलंदाजी करताना ४३ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकार मारले, तसेच तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पोलार्डने ३५ चेंडूंत नाबाद ६३ धावांची वादळी खेळी केली. त्याचे यंदाच्या आयपीएलमधील हे दुसरे अर्धशतक ठरले. पोलार्डने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. हार्दिक पांड्यानेही स्फोटक फलंदाजी करताना १४ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद २९ धावा केल्या. त्याने पॅट कमिन्सला अखेरच्या षटकात २ षटकार व एक चौकार मारला. या षटकात मुंबईने एकूण २३ धावा ठोकल्या.(वृत्तसंस्था)९८ १७ मार्च २०१० रोजी मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ९८ धावांनी पराभूत केले होते. दिल्लीला ११९ धावांचे टार्गेट होते. ६७ ३० एप्रिल २०१७ रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव ६७ धावांमध्ये संपुष्टात आला होता.संक्षिप्त धावफलकमुंबई इंडियन्स : २० षटकांत ३ बाद २१२. (लेंडल सिमन्स ६६, किरॉन पोलार्ड ६३, हार्दिक पांड्या नाबाद २९, पार्थिव पटेल २५. कागिसो रबाडा १/३३, अमित मिश्रा १/३७, कोरी अँडरसन १/२९).दिल्ली डेअरडेव्हिल्स : १३.४ षटकांत सर्व बाद ६६. (करुण नायर २१, कोरी अँरडसन १०, पॅट कमिन्स १०. कर्ण शर्मा ३/११, हरभजनसिंग ३/२२, लसिथ मलिंगा २/५).
मुंबई प्लेआॅफमध्ये
By admin | Published: May 07, 2017 12:48 AM