शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सीओएने घेतली मुंबईची विकेट

By admin | Published: March 19, 2017 8:29 PM

लोढा समितीने सुचविलेल्या एक राज्य, एक मत या शिफारशीचा अखेर मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) फटका बसला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) कारभारात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने सुचविलेल्या एक राज्य, एक मत या शिफारशीचा अखेर मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) फटका बसला. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीने (सीओए) सर्वात मोठा निर्णय घेताना एमसीएचे पूर्ण सदस्यत्व काढून घेतले आहे. सीओएने बीसीसीआयच्या नव्या संविधानाची व दिशानिर्देशकाची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली असून, याद्वारे एका राज्यातून केवळ एकच पूर्ण सदस्यत्व संघटना राहू शकते, हे स्पष्ट होत आहे.बीसीसीआयच्या संविधानाला अंतिम स्वरूप दिल्यानंतर सीओएने हा निर्णय घेतला. त्याचवेळी, या सीओएद्वारा बिहार, तेलंगना आणि उत्तर पूर्वेकडील राज्यांना पूर्ण सदस्यत्व बहाल करण्यात आले. विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे योगदान मुंबई क्रिकेटचे राहिले असल्याने सीओएने घेतलेला निर्णय धक्कादायक ठरला आहे.त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशींना मान्यता दिल्यानंतर एमसीएवर बंधन येणं हे अपेक्षित होतंच. परंतु, भारतीय क्रिकेटमधील असलेले भव्य योगदान पाहता एमसीएबाबत काहीतरी तोडगा काढण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सीओएने या सर्व आशांवर पाणी फेरले. दरम्यान, लोढा समितीच्या शिफारशींनुसार मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या पुर्वेकडील सर्व राज्यांना पुर्ण सदस्यत्व आणि मतदान देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तसेच, उत्तराखंड आणि तेलंगना राज्यांनाही हे अधिकार देण्यात आले. शिवाय बिहार राज्य संघटनेचे सर्व प्रलंबित प्रकरण संपल्यानंतरच त्यांना पूर्ण सदस्यत्व मिळेल. सीओएने घेतलेल्या या निर्णयानंतर 41 वेळचा रणजी चॅम्पियन एमसीए सहाय्यक सदस्य म्हणून बीसीसीआयमध्ये राहिल. त्याचप्रमाणे, गुजरात राज्याचे बडोदा आणि सौराष्ट्र यांनाही सहाय्यक सदस्य रहावे लागेल. त्याचप्रमाणे, एमसीएच्या प्रतिनिधींना बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधरण सभेमध्ये सहभागी होण्याची अनुमती देण्यात आली आहे. परंतु, त्यांना मतदान करण्याचे अधिकार नसतील........................................मुंबई क्रिकेटला खूप मोठा आणि जुना इतिहास आहे. भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईचे मोठे योगदान आहे. या प्रकरणी आम्ही व्यवस्थापकीय समितीच्या सभेमध्ये चर्चा करुन निर्णय घेऊ.- आशिष शेलार, अध्यक्ष - एमसीए