लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नील जोशी आणि अनन्या दाबके या मुंबईकरांनी डच स्क्वॉश स्पर्धेत आपले वर्चस्व राखताना १५ वर्षांखालील गटात अनुक्रमे मुलांचे व मुलींचे विजेतेपद पटकावले. नील व अनन्याच्या या कामगिरीमुळे स्पर्धेत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला.अव्वल मानांकीत असलेल्या नीलने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच लौकिकासा साजेशा खेळ करताना जेतेपदाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली. अंतिम फेरीत त्याला इंग्लंडच्या खलील अलहसनकडून कडवी झुंज मिळाली. पहिला गेम गमावल्यानंतर नीलने जबरदस्त पुनरागमन करत खलील पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. नीलने ९-११, ११-४, ११-५, ११-६ असा धडाकेबाज विजय मिळवताना खलीलचा धुव्वा उडवला. दुसरीकडे, मुलींच्या गटातही भारताचे वर्चस्व राहिले. अनन्याने स्पर्धेत चमकदार आगेकूच करताना सर्वांचे लक्ष वेधले. अतिम सामन्यत तीने स्पर्धेतील द्वितीय मानांकीत अमेरिकेच्या बलाढ्य सेरेना डॅनियल हिला सरळ तीन गेममध्ये ११-७, ११-४, १२-१० असे नमवले. या धक्कादायक विजयाच्या जोरावर अनन्याने आपले वर्चस्व राखले.
मुंबईकर नील, अनन्या यांचा दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 3:15 AM