शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मुंबईकरांनी पाटणाला लोळवले

By admin | Published: February 20, 2016 2:36 AM

गतविजेत्या यू मुंबाने दणकेबाज खेळाच्या जोरावर आतापर्यंत अपराजित असलेल्या पाटणा पायरेट्सला त्यांच्याच मैदानावर ३४-२८ असे दिमाखात लोळवले

रोहित नाईक, पाटणागतविजेत्या यू मुंबाने दणकेबाज खेळाच्या जोरावर आतापर्यंत अपराजित असलेल्या पाटणा पायरेट्सला त्यांच्याच मैदानावर ३४-२८ असे दिमाखात लोळवले. या शानदार विजयासह पाटणाविरुद्ध बंगळुरुला झालेल्या पराभवाची व्याजासहित परतफेड करताना मुंबईकरांनी इतर प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशाराच दिला आहे. पाटलीपुत्र स्टेडियममध्ये झालेल्या या लक्षवेधी सामन्यात मुंबईकरांनी पहिल्याच मिनिटापासून आक्रमक पवित्रा घेताना आपला इरादा स्पष्ट केला. मुख्य खेळाडूंच्या पुनरागमनाने बलाढ्य झालेल्या मुंबईकरांची एकूणच देहबोली पाहता पाटणाला यंदाच्य मोसमातील पहिला धक्का बसणार हे स्पष्ट होते. जबरदस्त आक्रमकतेने खेळणाऱ्या मुंबईकरांनी पहिल्याच डावात पाटणावर दोन लोण चढवून मध्यंतराला २४-९ अशी १५ गुणांची आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. मध्यंतरानंतर पाटणाने काही प्रमाणात प्रतिकार केला. रोहित कुमारने केलेल्या सुपर रेडच्या जोरावर पाटणााने मुंबईकरांवर लोण चढवून २४-३१ असे पुनरागमन केले. यावेळी पाटणाने झुंजार खेळ करत मुंबईकरांवर दबाव आणण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र दडपणात उत्कृष्ट खेळ करण्यात तरबेज असलेल्या मुंबईकरांनी अखेर बाजी मारलीच. रिशांक देवाडिगा व कर्णधार अनुप कुमार यांच्या खोलवर चढाया व फझेल अत्राचलीच्या दमदार पकडी मुंबईच्या विजयात निर्णयक ठरल्या. तर यजमानांकडून रोहित कुमारने एकाकी अपयशी लढत दिली. त्याआधी, बलाढ्य वॉरियर्सने सामन्यावरील पकड अखेरपर्यंत कायम राखताना तेलगू टायटन्सला ३२-२८ असे नमवले. १६व्या मिनिटाला तेलगूवर लोण चढवून मध्यंतराला १६-१२ असे वर्चस्व राखलेल्या बंगालला दुसऱ्या सत्रात तेलगू संघाने कडवी झुंज दिली. सुकेश हेगडे व राहूल चौधरी यांच्या चढाया व मेरज शेख, धर्मराज चेरलाथन यांच्या पकडी या जोरावर तेलगूने बरोबरी साधली. मात्र अतिआक्रमकपणा नडल्याने त्यांना आघाडी घेण्यात अपयश आले. ३९व्या मिनिटाला तेलगूवर दुसरा लोण चढवून बंगालने शानदार विजय निश्चित केला.