रायपूर : रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकताना गतविजेत्या मुंबईने हैदराबादविरुध्द मजबूत पकड मिळवली आहे. हैदराबादला विजयासाठी २३२ धावांचे आव्हान दिल्यानंतर चौथ्या दिवसअखेर मुंबईने त्यांची ७ बाद १२१ अशी केविलवाणी अवस्था केली.शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात नाममात्र १४ धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात २१७ धावांची मजल मारली. आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची फलंदाजी मुंबईकरांपुढे कोलमडली. फिरकीपटू विजय गोहिल याने भेदक मारा करताना केवळ २८ धावांत अर्धा संघ बाद करुन हैदराबादच्या फलंदाजीची हवा काढली.तिसऱ्या क्रमांकावरील बी. अनिरुध्दवरच (४०*) हैदराबादच्या आशा आहेत. तन्मय अगरवाल (२९), एस. बद्रिनाथ (१), कोल्ला सोमंथ (१४), मेहदी हसन (४), आकाश भंडारी (४)ला माघारी धाडून गोहिलने हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार पाडले.संक्षिप्त धावफलकमुंबई (पहिला डाव) : १०१.४ षटकात सर्वबाद २९४ धावा.हैदराबाद (पहिला डाव) : १२५.१ षटकात २८० धावा.मुंबई (दुसरा डाव) : ८३.२ षटकात सर्वबाद २१७ धावा (आदित्य तरे ५७, आदित्य तरे ४६; मोहम्मद सिराज ५/५२)हैदराबाद (दुसरा डाव) : ४२ षटकात ७ बाद १२१ धावा (बी. अनिरुध्द खेळत आहे ४०, बी. संदीप २५; विजय गोहिल ५/२८)
मुंबईकरांची पकड मजबूत
By admin | Published: December 27, 2016 4:01 AM