शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

मुंबईचा पो‘लॉर्ड’ विजय

By admin | Published: April 21, 2016 4:23 AM

मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील आपला दुसरा विजय मिळवताना बलाढ्य रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेटनी लोळवले. मुंबईने एकूण ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली.

रोहित नाईक, मुंबईकर्णधार रोहित शर्माच्या चमकदार अर्धशतकानंतर जोस बटलर आणि विध्वंसक किरॉन पोलार्ड यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील आपला दुसरा विजय मिळवताना बलाढ्य रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेटनी लोळवले. मुंबईने एकूण ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या शानदार सामन्यात बँगलोरने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करताना मुंबईने १८ षटकांतच ४ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. रोहितने ४४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावा फटकावल्या. अंबाती रायुडूनेही ३१ धावांची खेळी केली. रोहित-रायुडू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करून मुंबईच्या विजयाचा पाया घातला. इक्बाल अब्दुल्लाने रायुडूला बाद करून ही जोडी फोडली. मात्र, यानंतर बटलर आणि पोलार्ड यांनी चौफेर फटकेबाजी करताना बँगलोरच्या आव्हानातली हवा काढली. बटलरने १४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. तर, पोलार्डने केवळ १९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ३९ धावांचा विजयी तडाखा दिला. अब्दुल्लाने (३/४०) मुंबईला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहली व धडाकेबाज एबी डिव्हिलीयर्स यांच्या जोरावर बँगलोरने आक्रमक सुरुवात केली. मात्र, कृणाल पंड्याने एकाच षटकात या दोघांना बाद करून बँगलोरला कोंडीत पकडले. मात्र, अखेरच्या क्षणी ट्राविस हेड व सर्फराझ खान यांनी केलेल्या वेगवान ६३ धावांच्या भागीदारीच्या जोरावर जोरावर बँगलोरने मुंबईपुढे विजयासाठी १७१ धावांचे आव्हान उभे केले. हेडने २४ चेंडूंत ३७ धावा फटकावल्या, तर सर्फराझने १८ चेंडूंत २८ धावांचा तडाखा दिला. मुंबईकडून बुमराह (३/३१) व कृणाल (२/२७) यांनी चांगला मारा केला. > धावफलक :रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली झे. साउदी गो. कृणाल पंड्या ३३, लोकेश राहुल झे. हरभजनसिंग गो. मॅक्लेनघन २३, एबी डिव्हिलीयर्स यष्टीचीत (पटेल) गो. हार्दिक पंड्या २९, शेन वॉटसन झे. पटेल गो. बुमराह ५, ट्रॅव्हिस हेड धावबाद (हरभजन/पटेल) ३७, सर्फराझ खान झे. कृणाल पंड्या गो. बुमराह २८, स्टुअर्ट बिन्नी घे. हार्दिक पंड्या गो. बुमराह १, हर्षल पटेल नाबाद ०, केन रिचर्डसन नाबाद १; अवांतर : १३; एकूण : २० षटकांत ७ बाद १७०; गडी बाद होण्याचा क्रम : १/३२, २/९१, ३/९३, ४/९९, ५/१६२, ६/१६९, ७/१६९; गोलंदाजी : टीम साउदी ४-०-२५-०, मिशेल मॅक्लेनघन ४-०-४६-१, जसप्रीत बुमराह ४-०-३१-३, हरभजनसिंग २-०-२०-०, कृणाल पंड्या ४-०-२७-२, हार्दिक पंड्या २-०-१८-०.मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. डिव्हिलीयर्स गो. इक्बाल अब्दुल्ला ६२, पार्थिव पटेल झे. डिव्हिलीयर्स ५, अंबाती रायुडू झे. रिचर्डसन ूगो. इक्बाल अब्दुल्ला ३१, जोस बटलर झे. वॉटसन गो. इक्बाल अब्दुल्ला २८, किरॉन पोलार्ड नाबाद ३९, हार्दिक पंड्या नाबाद २; अवांतर : ०३; एकूण : १८ षटकात ४ बाद १७१; गडी बाद होण्याचा क्रम : १/६, २/८२, ३/१०९, ४/१४०; गोलंदाजी : वरुण अ‍ॅरॉन ४-०-३७-०, केन रिचर्डसन ३-०-२६-१, शेन वॉटसन ४-०-४०-०, हर्षल पटेल २-०-२०-०, इक्बाल अब्दुल्ला ४-०-४०-३, स्टुअर्ट बिन्नी १-०-८-०.