शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

मुंबईचा दुसरा डाव ढेपाळला

By admin | Published: March 10, 2016 2:36 AM

जयंत यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या अचूक माऱ्यापुढे इराणी ट्रॉफी समान्यात, शेष भारतविरुद्ध मुंबईचा दुसरा डाव केवळ १८२ धावांत संपुष्टात आला. मात्र, पहिल्या डावात घेतलेल्या २९७ धावांच्या

मुंबई : जयंत यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या अचूक माऱ्यापुढे इराणी ट्रॉफी समान्यात, शेष भारतविरुद्ध मुंबईचा दुसरा डाव केवळ १८२ धावांत संपुष्टात आला. मात्र, पहिल्या डावात घेतलेल्या २९७ धावांच्या आघाडीच्या जोरावर मुंबईकरांनी शेष भारतसमोर विजयासाठी ४८० धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. शेष भारतनेही दुसऱ्या डावाची भक्कम सुरुवात करताना, चौथ्या दिवसाअखेर १ बाद १०० अशी मजल मारली. अजूनही शेष भारताला विजयासाठी ३८० धावांची आवश्यकता आहे.ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात घेतलेल्या मजबूत आघाडीनंतर, फलंदाजीला उतरलेल्या मुंबईचा डाव शेष भारतच्या अचूक माऱ्यापुढे ढेपाळला. सिद्धेश लाडने मध्यल्या फळीत खेळताना झुंजार ६० धावांची खेळी केल्याने मुंबईला दीडशेची मजल मारता आली. त्याने १०९ चेंडूंत ६ चौकार व एक षटकार खेचला. त्याच वेळी सूर्यकुमार यादवनेही त्याला चांगली साथ देताना, ७६ चेंडूत ७ चौकारांसह ४९ धावा फटकावल्या. त्याचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले.४ बाद ६२ अशा प्रतिकूल परिस्थितीतून संघाला सावरताना सूर्यकुमार व लाड यांनी पाचव्या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी केली. जयंत यादवने सूर्यकुमारला बाद करून ही जोडी फोडली आणि पुढील ६६ धावांत मुंबईचा डाव संपुष्टात आणण्यात शेष भारत यशस्वी ठरला. जयंत यादवने टिच्चून मारा करताना ९३ धावांत ४ बळी घेतले, तर जयदेव उनाडकटने १६ धावांत ३ बळी मिळवले. यानंतर शेष भारतने सावध सुरुवात केली. फैझ फझल आणि श्रीकर भरत यांनी संघाला अर्धशतकी सलामी देताना ६६ धावांची भागीदारी केली. इक्बाल अब्दुल्लाने भरतला (४२) बाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. मात्र, यानंतर सुदीप चॅटर्जीने फझलला अखेरपर्यंत साथ देताना, मुंबईकरांना आणखी यश मिळवू दिले नाही. फझल ४१ धावांवर तर चॅटर्जी १७ धावांवर खेळत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)