मुंबई : ठाणो जिल्हा क्रीडा परिषद आणि ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय सिलंबम स्पर्धेत मुंबई संघाने अपेक्षित दबदबा राखत तब्बल 27 पदकांची लयलूट केली.
तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-युद्ध, एकेरी-दुहेरी काठी फिरवणो अशा प्रकारांत रंगलेल्या या स्पर्धेत मुंबई संघाने एकहाती वर्चस्व राखताना तब्बल 23 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 27 पदकांची लयलूट करीत निर्विवाद वर्चस्व राखले.
पुणो संघाने द्वितीय क्रमांक पटकावताना 3 सुवर्ण, 1क् रौप्य व 5 कांस्य अशी एकूण 18 पदकांची कमाई केली. तर औरंगाबाद संघ (1 सुवर्ण, 5 रौप्य, 5 कांस्य) 11 पदकांसह तृतीय क्रमांकावर राहिला. ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी किशोर येवले व अध्यक्ष रवी अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत ठाणो जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड, क्रीडा मार्गदर्शक भारती दिवेकर, माजी ठाणो जिल्हा क्रीडा अधिकारी रमेश पोशाम यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)