हरिदास ढोक, देवळी (वर्धा): महाराष्ट्र कुस्तीगीर परीषद व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी यांच्यावतीने आयोजित २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या महिला पहेलवांनी मैदान गाजविले. त्यात पुणे जिल्ह्याचाच बोलबाला राहिला असून इतर जिल्ह्याच्या पहेलवानांना छोबीपछाड देत स्पर्धेवर मोहर उमटविली. त्या पाठोपाठ मुंबईतील पहेलवानांनी कडवी झुंज देत उपविजेतेपदाचा मान पटकाविला.देवळी येथील नवनिर्मित खासदार रामदास तडस स्टेडीयमवर मागील चार दिवसांपासून महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचा महासंग्राम रंगला आहे. सुरुवातीला दोन दिवस पुरुषांची कुस्ती स्पर्धा पार पडली. त्यानंतर मंगळवार व बुधवारी महिलांची २१ वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा चांगलीच रंगली. दोन दिवस चालेल्या या महिला कुस्त्यांच्या सामन्यामध्ये विविध वजन गटात स्पर्धा झाली. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, लातूर, अहमदनगर, बीड, धुळे, अमरावती व नागपूर या जिल्ह्यातील पहेलवानांनी कुस्तीचा फड गाजवून पारितोषीक पटकाविले. या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
विदर्भातील पाच महिला मल्लांनी मारली बाजी २१ व्या महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विदर्भातील महिला पहेलवानांनीही सहभाग घेतला होता. विदर्भातील मल्लांनीही आपल्या खेळाची चुणूक दाखवून विदर्भाचा ठसा उमटविला. या स्पर्धेत नागपूरच्या प्रिया घरजाळे हिने ५५ किलो वजन गटात तर अमरावतीच्या श्वेता सवई हिने ५७ किलो, भारती आमघरे हिने ६५ किलो व खुशबू चौधरीने ६८ किलो वजन गटात आपले वर्चस्व कायम राखले आहे.
वजन गटानुसार विजेत्या महिला पहेलवान५० वजन गटकाजल जाधव सोलापूरकिर्ती गुडलेकर धुळेनिकिता गायकवाड ठाणेप्रगती ठोंबरे बीड
५३ वजन गटदिक्षा कराडे कोल्हापूरअक्षता वाळूज पिंपरी चिंचवडकोमल देसाई ठाणेसोनम सरकार सोलापूर
५५ वजन गटप्रिया घरजाळे नागपूररुपाली वरदे औरंगाबादप्रतिक्षा मुडे बीडश्रद्धा भोर पुणे
५७ वजन गटसोनाली तोडकर बीडप्रितम दाभाडे पुणेश्वेता सवई अमरावतीलक्ष्मी पवार लातूर
५९ वजन गटविश्रांती पाटील कोल्हापूरकाजल ढाकने अहमदनगरप्रतिक्षा नायकवाडे सोलापूरदुपाली सोनी पिंपरी चिंचवड
६२ वजन गटअंकिता गुंड पुणेभाग्यश्री भोईर कल्याणऋृतिका मानकर मुंबईसरोज पवार ठाणे
६५ वजन गटमनाली जाधव ठाणेभारती आमघरे अमरावतीजस्तिन शेख नाशिकजैमिया बागवान लातूर
६८ वजन गटहर्षदा जाधव पुणेखुशबू चौधरी अमरावतीशिवाणी पाटील मुंबईतेजल सोनवने पुणे
७२ वजन गटकोमल गोळे पुणेऋतुजा सपकाळ कोल्हापूरप्रियंका दुबुले सांगलीवैष्णवी पायगुंडे सातारा
७६ वजन गटमनिषा दिवेकरस्वाती पाटील मुंबईवर्षाराणी पाटील मुंबईभाग्यश्री गडकर कल्याण