बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्याआधी डोपिंगमुळे भारताचा एक-एक खेळाडू बाहेर होत असताना आता आणखी एक वाद चव्हाट्यावर आला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेनने आपल्या प्रशिक्षिकेचा मानसिक छळ सुरू असून, याचा परिणाम सरावावर होत असल्याचा आरोप केला आहे.
लवलिना आयर्लंडमधील तयारी आटोपून रविवारी क्रीडाग्राममध्ये दाखल झाली. त्यावेळी लवलिनाची खासगी प्रशिक्षिका संध्या गुरुंग यांना क्रीडाग्राममध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्याकडे ओळखपत्र (ॲक्रिडेशन) नव्हते, असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्या तयारीवर परिणाम होत असल्याचे सांगत लवलिनाने सांगितले. वलिनाची प्रशिक्षिका संध्या गुरुंग या द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त आहे. तिच्या एका प्रशिक्षकांनाच आता थेट घरी पाठवण्यात आले आहे, तर दुसऱ्या प्रशिक्षकांना तिच्याबरोबर राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे लवलिनाने सराव करायचा तरी कसा, हा प्रश्न सध्याच्या घडीला तिच्यापुढे आहे.
आज मी अत्यंत वेदनेने सांगत आहे की, मला खूप त्रास दिला जात आहे. प्रत्येक वेळी माझे प्रशिक्षक, ज्यांनी मला ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून देण्यास मदत केली, त्यांना दूर करत काही लोक माझ्या सरावात अडथळे आणत आहेत. - लवलिना बोरगोहेन