शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

नदाल विजयी, जोको पराभूत

By admin | Published: June 08, 2017 4:21 AM

फ्रेंच ओपनचा गतविजेता नोवाक जोकोविच याला आॅस्ट्रेलियाचा सातवा मानांकित खेळाडू डॉमनिक थीम याने पराभवाचा धक्का दिला

पॅरीस : फ्रेंच ओपनचा गतविजेता नोवाक जोकोविच याला आॅस्ट्रेलियाचा सातवा मानांकित खेळाडू डॉमनिक थीम याने पराभवाचा धक्का दिला. थीम याने जोकोविचला ७-६(७-५), ६-३, ६-० असे पराभूत करत खळबळ माजवून दिली. थीमचा उपांत्य फेरीतील सामना आता ९ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदाल याच्यासोबत होणार आहे. जोकोविच आमि थीम यांच्यातील लढतीत पहिला सेट अटीतटीचा झाला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये थीम याने जोकोवर वर्चस्व गाजवले. तिसऱ्या सेटमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि गतविजेत्या जोकोविचला एकही गुण मिळवता आला नाही. हा सेट त्याने ६-० अशा मोठ्या फरकाने गमावला. या विजयासोबतच थीम याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नदाल सोबत होईल. दुसरीकडे नदाल याने दहाव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. पोटदुखीमुळे स्पेनच्याच पाब्लो कारेनो बस्टा याने सामन्यातून माघार घेतली आणि नदालचा उपांत्य फेरीतील प्रवेश सोपा झाला. कारेनो बस्टा याने माघार घेतली तेव्हा नदाल ६-२,२-० असा आघाडीवर होता. विक्रमी नऊ वेळचा फ्रेंच ओपन विजेता नदालला उपांत्य फेरीत जोकोविचशी सामना करावा लागू शकतो. जोको याला उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रियाच्या सहाव्या मानांकित डोमिनिक थीम विरोधात खेळायचे आहे. नदाल याने पहिल्या सेटमध्ये चार वेळा कारेनो बस्टो याची सर्व्हिस तोडली. पहिल्यादांच ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेल्या बस्टोला ५१ मिनिटांनंतर पोटदुखीमुळे बाहेर पडावे लागले. पहिल्या सेटनंतर त्याने वैद्यकीय पथकाची मदत घेतली होती. क्ले कोर्टवर नदालचा शंभरावा विजयचौथ्या मानांकित नदाल याने क्ले कोर्टवर खेळल्या गेलेल्या पाच सेट असलेल्या १०२ पैकी १०० सामन्यात विजय मिळवला आहे. खुल्या काळात दहा वेळा एकाच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचणारा तो पाचवा पुरुष खेळाडू आहे. फ्रेंच ओपनमध्ये त्याने ७७ सामने जिंकले, तर दोन वेळा त्याला पराभवाचा सामना करावा लागला. नदाल याने २०१४ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये आपले अखेरचे ग्रॅण्डस्लॅम पटकावले होते.