शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

नदालच क्ले कोर्टचा बादशाह! दहाव्यांदा पटकावले फ्रेंच ओपनचे विजेतेपद

By admin | Published: June 11, 2017 9:25 PM

क्ले कोर्टवरचा बादशाह म्हणजे राफाएल नदालच, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम

ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 11 -  क्ले कोर्टवरचा बादशाह म्हणजे राफाएल नदालच, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत स्पेनच्या नदालने स्वित्झर्लंडच्या स्टॉनिस्लॉस वावरिंकाचा 6-2, 6-3, 6-1 असा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवला आणि विक्रमी दहाव्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. नदालचे हे कारकिर्दीतील एकूण 15 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. 
आज झालेल्या अंतिम लढतीत आपल्या लौकिकाला जागत नदालने जबरदस्त खेळ केला. त्याने सुरुवातीपासूनच या लढतीवर आपली हुकुमत गाजवली. त्याने पहिल्या सेटमध्ये वावरिंकावर वर्चस्व राखताना पहिला सेट 6-2 ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही नदालचाच बोलबाला राहिला. त्याने हा सेटसुद्धा 6-3 अशा फरकाने आरामात खिशात घातला. 
सलग दोन सेट जिंकल्यानंतर राफाने वावरिंकाला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. अखेर हा सेटसुद्धा 6-1 अशा दबदब्यासह जिंकत नदालने हा सामना 6-2, 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये जिंकला आणि विजेतेपदावर कब्जा केला. याआधी नदालने 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014 असे एकूण नऊ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यंदाचे हे विजेतेपद नदालचे दहावे विजेतेपद ठरले आहे. त्याबरोबरच दहावेळा फ्रेंच ओपन जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू बनला आहे. तर महिला एकेरीमध्ये मार्गारेट कोर्ट यांनी 11 वेळा फ्रेंच ओपन जिंकण्याचा विक्रम केला होता. 
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य लढतींमध्ये  वावरिंकाने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेचा पराभव केला.अंतिम फेरी गाठणारा तो गेल्या ४४ वर्षांतील सर्वांत प्रौढ खेळाडू ठरला. निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीत वावरिंकाने मरेची झुंज ६-७, ६-३, ५-७, ७-६, ६-१ ने मोडून काढली.२०१५ च्या चॅम्पियनला आता ९ वेळचा विजेता राफेल नदाल आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्पेनच्या राफेल नदालने दुसऱ्या उपांत्य लढतीत डोमिनिक थियेमचा ६-३,६-४,६-० ने पराभव केलो. दोन तास सात मिनिटेचाललेल्या या सामन्यात नदाल याने थीमवर वर्चस्व गाजवले. तिसऱ्या सेटमध्ये थियेमला एकही गुण मिळवता आला नाही.