पुणे : भारतीय मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडरेशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांची आशियाई मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघाच्या (एएमपीसी) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. किरगिझीस्तान येथे नुकतीच एएमपीसीची निवडणूक झाली. यात ३४ वर्षीय शिरगावकर यांनी कोरियाचे सांकेओंग येओ यांच्यावर विजय मिळविला. शिरगावकर यांच्या निवडीने या पदावरील कोरियाची २५ वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आली. शिरगावकर हे भारतीय आॅलिम्पिक संघटनेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. मॉडर्न पेन्टॅथलॉन या आॅलिम्पिक क्रीडाप्रकारात तलवारबाजी, पोहणे, घोडेस्वारी, धावणे व लेझर गन शूटिंग अशा ५ खेळांचा समावेश आहे. शिरगावकर यांची सरचिटणीसपदी निवड झाल्यामुळे एएमपीसीचे मुख्यालय भारतात स्थलांतरित होणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)>एक खेळाडू या नात्याने देशातील खेळाडूंच्या मूलभूत समस्यांची जाण मला आहे. बहुतांश खेळाडू प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदत, सोई-सुविधा यावर अवलंबून असतात. एएमपीसीच्या सरचिटणीसपदी काम करत असताना ही प्रणाली सुधारण्यावर माझा भर असेल.- नामदेव शिरगावकर, सरचिटणीस, आशियाई मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघ
आशियाई मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघाच्या सरचिटणीसपदी नामदेव शिरगावकर
By admin | Published: November 02, 2016 3:46 AM