ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - रिओ ऑलिम्पिक स्पर्धा काही दिवसांवर आली असताना प्रसिद्ध कुस्तिपटू नरसिंह यादव दुस-या डोपिंग चाचणीतही अपयश ठरला आहे. त्यामुळे त्याची रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागाची आशा जवळपास मावळली आहे. या आधी 25 जूनला पहिल्यांदा घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीतही नरसिंह यादव अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याची दुसरी डोपिंग चाचणी घेण्यात आली.
दुस-या चाचणीसाठी 'अ' आणि 'ब'चे नमुने 5 जुलैला घेण्यात आले होते. मात्र यामध्ये पहिल्या चाचणीसारखाच तो दुस-या चाचणीच अयशस्वी ठरला आहे. नरसिंह उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघानं नरसिंहऐवजी प्रवीण राणा याचं नाव पुढे केलं आलं आहे. 74 किलो फ्री स्टाईल प्रकारात भारताचा कोटा खाली राहू नये, यासाठी भारतीय कुस्ती संघटनेनं हा निर्णय घेतला आहे.
नरसिंहसोबत घडलेल्या प्रकारानंतर ऑलिम्पिक महासंघाने भारताला दुसरे नाव सामाविष्ट करण्याची संधी दिली होती. त्यानंतर प्रवीण राणाचे नाव निश्चित करून ऑलिम्पिक संघटनेकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी आपल्याविरोधात कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप करत नरसिंह यादवने चौकशीची मागणी केली आहे.