शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

नरेंद्र बत्रा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय हॉकीची धुरा

By admin | Published: November 13, 2016 2:35 AM

काही दिवसांपूर्वीच भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाने एकापाठोपाठ एक आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारत देशवासीयांना दिवाळी भेट दिली होती. आता, यानंतर

दुबई : काही दिवसांपूर्वीच भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाने एकापाठोपाठ एक आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारत देशवासीयांना दिवाळी भेट दिली होती. आता, यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी विश्वाच्या निवडणुकीतही भारतीय उमेदवाराने बाजी मारत पुन्हा एकदा अभिमानाने तिरंगा फडकवला आहे. हॉकी इंडियाचे (एचआय) अध्यक्ष नरेंद्र ध्रुव बत्रा यांची आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या (एफआयएच) अध्यक्षपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या पदी निवड झालेले ते पहिले भारतीय तर ठरलेलेच आहेत, त्याचबरोबर पहिले आशियाईदेखील ठरले आहेत.देशातील एक दिग्गज क्रीडा प्रशासक म्हणून ५९ वर्षीय बत्रा यांची छबी आहे. शनिवारी झालेल्या एफआयएचच्या ४५व्या काँग्रेसदरम्यान त्यांनी बहुमत मिळवत अध्यक्षपद मिळवले. एफआयएचया अध्यक्षपदासाठी त्यांच्यासमोर आयर्लंडच्या डेव्हीड बालबर्नी आणि आॅस्टे्रलियाच्या केन रीड यांचे कडवे आव्हान होते. परंतु, या दोघांवरही वर्चस्व राखताना बत्रा यांची निवड झाली.या मतदानामध्ये एकूण ११८ मतांपैकी सर्वाधिक ६८ मते बत्रा यांच्या पारड्यात पडली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले बालबर्नी आणि रीड यांना अनुक्रमे २९ व १७ मतांवर समाधान मानावे लागले. एफआयएचचे १२ वे अध्यक्ष म्हणून बत्रा आंतरराष्ट्रीय हॉकीचे नेतृत्व करतील. दखल घेण्याची बाब म्हणजे अध्यक्षपदी विराजमान झालेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले असल्याने भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली. अध्यक्षपदाची ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक प्रणालीने गुप्तपणे पार पडली. या मतदानासाठी प्रत्येक राष्ट्रीय संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाला एक टॅबलेट,युनिक पासवर्ड देण्यात आले होते. यानुसार गुप्त मतदान झाले. मावळते अध्यक्ष लिएंड्रो नेग्रे यांनी निवडणुकीच्या निकालाची घोषणा केली. दरम्यान, बत्रा यांच्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय हॉकीचे केंद्र आता युरोपऐवजी आशिया होणार असल्याने बत्रा यांचा विजय आशियाई देशांसाठी विशेष ठरला आहे.(वृत्तसंस्था) एफआयएचचे अध्यक्षपद मिळणे माझ्यासाठी भावनात्मक आणि सन्मानजनक क्षण आहे. भौगोलिक सीमांच्या आधारे खेळाचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचे माझे प्रथम काम असेल. भारत - पाकिस्तान यांच्यामध्ये राजकीय तणाव असल्याबाबत कोणतीही शंका नाही आणि याकडे कोणी दुर्लक्षही करू शकत नाही. मात्र, भारत आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध कुठेही खेळावेच लागेल. तसेच शुक्रवारी भारत व पाकिस्तान संघटनांच्या प्रतिनिधींची भेट झाली आणि त्यावेळी जुन्या वादांवर तोडगा काढला आहे. - नरेंद्र बत्रा, अध्यक्ष - एफआयएच