नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि आॅलिम्पिक कोटा मिळविणारा नरसिंग यादव यांच्यादरम्यान चाचणीचे आयोजन करायचे की नाही, याचा निर्णय ६ जून रोजी होणार आहे. दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणाची पाचव्यांदा सुनावणी पूर्ण होताच गुरुवारी निकालाची तारीख निश्चित केली. आजच्या सुनावणीदरम्यान सुशीलचे वकील अमित सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान सरकार, तसेच साईने सुशीलला दिलेल्या सर्वच पत्रांची प्रत सादर केली. त्यात सुशीलला सराव शिबिरात सहभागी होण्यास सांगणे, तसेच जॉर्जियात सरावासाठी जाणे आदींचा समावेश होता. रिओला पाठवायचे नव्हते, तर सुशीलला तसे आधीच सांगायला हवे होते. त्याने कठोर मेहनत घेतलीच नसती. आॅलिम्पिक तयारीसाठी सुशीलला आॅलिम्पिक पोडियम स्कीममध्ये(टॉप) ठेवण्यात आले होते. सुशीलने जॉर्जियातून परतल्यानंतर क्रीडामंत्री आणि फेडरेशनला पत्र लिहून आपण फिट असून, चाचणीसाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. त्याला विदेशात सराव करण्यासाठी पाठविण्याचा निर्णय फेडरेशनचा होता. आॅलिम्पिक डोळ्यांपुढे ठेवूनच हा सर्व प्रकार करण्यात आला.सुशीलने जॉर्जियात भारतीय पथकाच्या वेगळे राहून सराव करीत पैशाचा दुरुपयोग केल्याचा आरोप फेडरेशनच्या वकिलाने केला. यावर सुशीलने सांगितले, की भारतीय मल्लांसोबत सराव करायचा असता, तर मी भारतातच सराव करू शकलो असतो. मला जॉर्जियात माझ्यापेक्षा श्रेष्ठ मल्लांसोबत खेळायचे होते.७४ किलो फ्री स्टाईल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माझ्यात आणि नरसिंगमध्ये चाचणीचे आयोजन व्हावे, या मागणीसाठी सुशीलने ही याचिका दाखल केली आहे. (वृत्तसंस्था)भारतीय कुस्ती महासंघ मात्र ज्या मल्लाने कोटा मिळविला तोच आॅलिम्पिकला जाईल, या भूमिकेवर ठाम आहे. फेडरेशनची तसेच नरसिंगची बाजू मांडणाऱ्या वकिलानेदेखील याच बाबीवर भर दिला. रिओसाठी जी १८ मल्लांची यादी पाठविण्यात आली, त्यापैकी पाच-सहा मल्लांना नरसिंगने पराभूत केले. त्यावर सिब्बल म्हणाले, ‘‘रिओला नावे पाठविण्याची अखेरची तारीख १८ जुलै आहे. अन्य देशांत चाचण्या सुरूच आहेत. अंतिम यादी तयारच झाली नाही, तर नरसिंगने कोणत्या मल्लांना हरविले, हे कसे काय कळले!
नरसिंग की सुशील?
By admin | Published: June 03, 2016 2:31 AM