भक्ती चैतन्यात नशिराबादकर तल्लीन
By admin | Published: January 24, 2016 10:20 PM
नशिराबाद : वार्ताहर
नशिराबाद : वार्ताहरटाळ-मृदुंग व ढोलताशांचा गजर, विणेचा झंकार आसमंत निनादणारा ज्ञानोबा-तुकारामांसह हरिनामाचा जयघोष, सजीव आरास, हजारोंचा सहभाग अशा सौहर्द्राच्या भक्तीमय चैतन्याने भारलेल्या वातावरणात नशिराबादला ज्ञानेश्वरी पारायण महोत्सवाची भव्य शोभायात्रा दिंडीने रविवारी सांगता करण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणार्या महोत्सवात भाविक भक्तीरसात न्हानून निघाले.सकाळपासूनच सर्वत्र धार्मिक वातावरण होते. राजाराम शास्त्री महाराज यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर आठवडे बाजारापासून शोभायात्रा मिरवणुकीस प्रारंभ झाला. अग्रभागी ढोल-ताशाच्या ठेक्यावर तरुण काठी फिरून मनोरे सादर करीत होते. त्यामागे ११ घोडे सर्वांचे लक्षवेधून होत होते. नाचणार्या घोड्याचे सर्वांना आकर्षण होते. त्यामागे बैलगाडीवर सजविलेला सजीव आरास आकर्षक होता. सुरेश महाराज, सुनील महाराज व सहकारी विविध भजने गात होते. त्या तालावर तरुणांसह भाविक पाऊले खेळण्यात तल्लीन झाले होते. महिलांनी भजनाचा ठेका घेत फुगड्या, पाऊली खेळत होत्या. शेकडो महिलांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व तुळशी घेऊन सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रा मार्गावर भव्य रांगोळ्यातून गाय वाचवा, देश वाचवा, बेटी पढाओ, बेटी बचाओसह वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात येत होता. ठिकठिकाणी शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.लोकप्रतिनिधींच्या रंगल्या फुगड्यारामपेठ चौकात टाळ-मृदुंगावर ठेका धरत भाविकांसह लोकप्रतिनिधींच्या फुगड्या रंगतदार झाल्या. फुगड्या नृत्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी आध्यात्माची गोडी लावणारे सुरेश महाराज यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी सत्कार केला. फुगडी खेळली.लोकप्रतिनिधींनेही नृत्य, फुगडी खेळून टाळ्यांची दाद मिळविली.एकात्मतेचे दर्शनमहोत्सवाच्या सांगतेनिमित्त ४६ पोते गव्हाचा भव्य महाप्रसाद झाला. सुमारे २३ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शिस्तबद्ध नियोजन व सामाजिक एकात्मतेचे दर्शन यावेळी घडले. ग्राममहोत्सव याची सर्वत्र ओळख आहे. २८ वर्षांची अखंड परंपरा सुरू आहे. महोत्सवात सुमारे दीड हजार महिला-पुरुषांनी पारायण वाचन केले.शोभायात्रेत गुंजन पाटील, शतायु देशपांडे, मीनल पाटील आदींनी सजीव आरासात भूमिका केली. यशस्वीतेसाठी महोत्सव समितीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. धर्मरक्षक ग्रुपतर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.फोटो